• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

मंत्री गिरीश महाजनांचे सिडकोला तातडीने कार्यवाहीचे आदेश; प्रकल्पबाधितांच्या विविध मागण्यांवरही सविस्तर चर्चा

पेण, प्रतिनिधी : बाळगंगा धरण प्रकल्प, ता. पेण येथील प्रकल्पबाधित गावांच्या पुनर्वसनासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस आमदार रविशेठ पाटील आणि माजी राज्यसभा खासदार धैर्यशीलदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

RelatedPosts

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

बैठकीला पाटबंधारे विभागाचे सचिव, पुनर्वसन अधिकारी गायकवाड, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण पवार, प्रांताधिकारी पेण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बाळगंगा प्रकल्पबाधित गावांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास शासनस्तरावर मान्यता देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव तातडीने सिडकोकडे देण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला प्रशासकीय पातळीवर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बैठकीत प्रकल्पबाधितांच्या विविध मागण्यांवरही सविस्तर चर्चा झाली. यामध्ये पुनर्वसन जागांचा आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करणे, पुनर्वसन व बुडीत क्षेत्रातील मिसिंग प्लॉट संपादन, १३५५ प्लस १८ वर्षांवरील मुलांचे केलेले कुटुंब संकलन कायम ठेवणे, स्वेच्छा पुनर्वसन पॅकेज प्रसिद्ध करणे आणि ०.४० व्याजाच्या प्रस्तावास मंजुरी देणे आदी मागण्यांचा समावेश होता.

तसेच बुडीत क्षेत्राबाहेरील गावांसाठी रिंग रोडकरिता जागा संपादन करणे, आदिवासींच्या जमिनींच्या मोबदल्याबाबत प्रस्ताव तयार करणे, संकलनातून अपात्र ठरलेल्या कुटुंबांना पात्र करून त्यांचा संकलनात समावेश करणे तसेच न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

आमदार रविशेठ पाटील आणि माजी राज्यसभा खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासनस्तरावर मांडत प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले.

Tags: Pradip Satane
Previous Post

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

Next Post

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

Related Posts

ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
4
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
3
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
11
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
12
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली
ताज्या घडामोडी

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

September 30, 2026
11
Next Post

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In