• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासवणे एसटी बससेवेसाठी ‘सारथी महाराष्ट्राचा’च्या बातमीला यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
127
VIEWS
Ad 1
Ad 1

पाच महिन्यांपासून बंद असलेली अलिबाग-सासवणे बससेवा लवकरच होणार पूर्ववत; २२ ऑगस्टला यशस्वी ट्रायल

अलिबाग : प्रतिनिधी

गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या अलिबाग-सासवणे मार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा अखेर पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आली आहे. या समस्येची दखल घेत ‘सारथी महाराष्ट्राचा’ ने एसटी बससेवा बंद असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताला आता यश आले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी गावातील मिलिंद ठाकूर, अमोल काठे, मंगेश गावंड, प्रणय घरत यांच्यासह ग्रामस्थांनी अलिबाग एसटी आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पंचायत समितीच्या उपाध्यक्षा प्रिया प्रमोद भगत, प्रमोद भगत सर, स्थानिक आमदार महेंद्र दळवी आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेही बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय ग्रामस्थांच्या सुमारे शेकडो सह्यांचा अर्ज प्रशासनाकडे सादर करून एसटी सेवा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली होती.

या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी अलिबाग ते सासवणे मार्गावर एसटी बसची ट्रायल घेण्यात आली. ही ट्रायल यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर येत्या पाच दिवसांत बससेवा नियमितपणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बससेवा पुन्हा सुरू होणार असल्याने सासवणे परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार आणि नियमित प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत होती.

दरम्यान, अलिबाग आगाराच्या उपलब्ध वेळापत्रकाच्या माहितीत सासवणे मार्गाचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे. बससेवा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एसटीच्या विद्यार्थी बस पास योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

‘सारथी महाराष्ट्राचा’च्या वृत्तासोबत ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे यश असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Ad 1
Tags: Amol
Previous Post

सरकारी शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

Next Post

मौदा तालुक्यातील सालवा येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

मौदा तालुक्यातील सालवा येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In