• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी

अमळनेर : प्रतिनिधी

शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवक तसेच महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांचा अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांची भेट घेऊन निवेदन साद केले. दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

निवेदनात दोन गंभीर घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवरे, ता. पारोळा येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांच्यावर काही ग्रामस्थांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. जीव वाचविण्यासाठी पळत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात ७ ऑगस्ट २०२६ रोजी पथदिव्यांची दुरुस्ती करत असलेल्या महापालिकेच्या कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी (वय ३१) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे मंचाने निवेदनात म्हटले आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी

“कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण ही शासनाची जबाबदारी आहे,” अशी भूमिका मांडत वरील घटनांची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंचाने केली.

राजपूत समाजातील दोन्ही पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत. तसेच भविष्यात शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

अशा घटनांमुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजावरही विपरीत परिणाम होतो, असे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मंचाचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह अनिल पाटील, चेतन राजपूत, जयराम पाटील, विलास पाटील, जयदीप पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, अमोल राजपूत, कुणाल गिरासे, भोजराज राजपूत, दिलीप पाटील, रोहिदास पाटील, विक्रम पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रकाश पाटील, समाधान धनगर, अजयसिंग पाटील, आशिष राजपूत, भरतसिंग पाटील आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

Next Post

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In