• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
72
VIEWS
Ad 1
Ad 1

कृषी विभाग व ‘आत्मा’चे आयोजन; स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व आणि पोषणमूल्यांची माहिती

दर्यापूर : प्रतिनिधी

पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दर्यापूर येथील अनंत संगम मंगल कार्यालयात ‘रानभाजी महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

पावसाळ्याच्या दिवसांत पारंपरिक भाज्यांची उपलब्धता कमी होत असताना स्थानिक परिसरात मिळणाऱ्या विविध रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. या पारंपरिक व नैसर्गिक अन्नसंपत्तीची नागरिकांना ओळख व्हावी, रानभाज्यांचे पोषणमूल्य व आरोग्यदायी फायदे समजावेत तसेच त्यांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

महोत्सवात करटोली, दिंडा, टाकळा, आंबुशी, आघाडा, केना, पाथरी, शेवगा, अळू, पानाचा ओवा, कपाडकोडी, बांबू, उंबर, अंबाडी, मटारू आणि भुई आवळी यांसह विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.

या महोत्सवाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी कु. आरती साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, तंत्र अधिकारी प्रताप रोडे, संतोष राणे, अमोल सावरकर, विपीन चंदनकर, प्रगतिशील शेतकरी सुभाष लाजूरकर, कु. फाल्गुनी नानीर, गुणनियंत्रण अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रानभाज्यांचे महत्त्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच रानभाज्यांसाठी विपणन साखळी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात नागरिक, गृहिणी, युवक-युवती, शेतकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

रानभाज्यांपासून तयार करण्यात येणारे विविध चविष्ट व पौष्टिक पदार्थ, त्यांचे आरोग्यदायी फायदे आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध नैसर्गिक अन्नसंपत्ती याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये रानभाज्यांविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. आरती साबळे यांनी केले. उपकृषी अधिकारी कुणावत यांनी सूत्रसंचालन केले, तर कु. फाल्गुनी नानीर यांनी आभार मानले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आत्माचे सागर बोंडे, विशाल भडके, पाणी फाउंडेशनचे सूरज कोरडे आणि गौरव नागे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 1
Tags: Dipak Meshram
Previous Post

विकास विद्यालयात विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी

Next Post

मशिनरी खरेदीच्या व्यवहारात महिलेची ६.३५ कोटींची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

मशिनरी खरेदीच्या व्यवहारात महिलेची ६.३५ कोटींची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In