• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यंकटराव शिक्षण संकुलात रक्षाबंधन उत्साहात साजरे

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
व्यंकटराव शिक्षण संकुलात रक्षाबंधन उत्साहात साजरे
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

आजरा : येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये बंधुभाव, स्नेह, आपुलकी व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थीनींनी स्वतःच्या कल्पकतेतून व कौशल्यातून आकर्षक राख्या तयार केल्या होत्या. या स्वयंनिर्मित राख्या त्यांनी प्रशालेतील विद्यार्थी बंधूंना बांधून रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे संपूर्ण प्रशालेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावी ‘ब’चे वर्गशिक्षक श्री. एस. वाय. भोये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केले. यावेळी व्यंकटराव शिक्षण संकुलाचे संचालक श्री. सचिन (भैय्या) शिंपी यांचे प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थीनी तसेच प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार व शिक्षिकांनी औक्षण करून त्यांना राखी बांधली. यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षक बंधूंनाही विद्यार्थीनींनी प्रेमपूर्वक राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गातील भगिनींकडून राखी बांधण्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थीनींनी आपल्या बंधूंच्या मनगटावर राखी बांधत परस्पर स्नेह, प्रेम आणि संरक्षणाची भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये आपुलकीचे आणि कौटुंबिक वातावरण निर्माण झाले.

रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून परस्पर प्रेम, विश्वास, जिव्हाळा, स्नेह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा सण आहे. या भावनेतून प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य श्री. एस. एन. पाटील, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया पाईम ,तनिष्का मांगले यांनी केले व अंकिता देसाई, गुंजन मोरे, वैष्णवी मातले, हंसिका नाईक, कविता सांगणे ,भाग्यश्री इलगे यांनी रक्षाबंधन बद्दल माहिती सांगितली. तसेच आभार मानसी पवार यांनी मांडले.

Ad 1
Previous Post

कळमेश्वर विद्यालय पिंपळगाव येथे राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त घेण्यात आली कबड्डी स्पर्धा

Next Post

दुःखद निधन वार्ता

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
दुःखद निधन वार्ता

दुःखद निधन वार्ता

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In