• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेशोत्सवाची तयारी जोमात; मूर्तींची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
गणेशोत्सवाची तयारी जोमात; मूर्तींची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

लोह्यातील भगवान सळवणे यांच्या गणेशमूर्तींना परराज्यातून मोठी मागणी; कर्नाटक, तेलंगणातील मंडळांकडून खरेदीसाठी गर्दी

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

लोहा, वार्ताहर
गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सर्वत्र जोमाने सुरू झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणेशमूर्तींच्या आगमनासाठी लगबग सुरू असून, लोह्यातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींवर रंगरंगोटी व सजावटीचे अंतिम काम युद्धपातळीवर सुरू आहे. मूर्तिकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवत असून, आकर्षक व देखण्या गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी कारागिरांची धावपळ सुरू आहे.
लोहा शहरातील बायपास रोड परिसरातील भगवान सळवणे यांच्या ‘जगदीश मूर्ती आर्ट’ या मूर्ती कारखान्यात यंदाच्या गणेशोत्सवासाठी विविध आकारांच्या आकर्षक गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा त्यांच्या गणेशमूर्तींना महाराष्ट्राबरोबरच परराज्यातूनही मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक राज्यातील भालकी, औराद, कमलनगर, बिदर, काळगी तसेच तेलंगणा राज्यातील हैदराबाद, निजामाबाद आदी भागांतून गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मूर्ती खरेदीसाठी लोह्यात येत आहेत.

अर्ध्या फुटापासून बारा फुटांपर्यंत मूर्ती

मूर्तिकारांच्या कार्यशाळेत अर्ध्या फुटापासून तब्बल बारा फुटांपर्यंत विविध आकारांच्या गणेशमूर्ती तयार करण्यात येत आहेत. मंडळांच्या मागणीनुसार मूर्तींची उंची, आकार, मुकुट, रंगसंगती आणि आकर्षक सजावट यामध्ये विविधता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाला आपल्या आवडीची व बजेटनुसार गणेशमूर्ती निवडण्याची संधी मिळत आहे.
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी साचा, पीओपी तसेच नारळाच्या कातीसह विविध कच्च्या साहित्याचा वापर केला जातो. मूर्तीचा प्राथमिक आकार तयार केल्यानंतर तिच्यावर बारकाईने काम करून मूर्तीला सुबक रूप दिले जाते. त्यानंतर रंगरंगोटी, डोळ्यांची रेखीव रचना, मुकुट व अलंकारांची सजावट करून मूर्तीला अंतिम आकर्षक स्वरूप प्राप्त होते.

उंचीनुसार वाढते मूर्तीचे दर

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, मजुरी, रंगरंगोटी आणि सजावटीचा खर्च वाढल्याने यंदा मूर्तींच्या किमतीतही वाढ झाली आहे. साधारण पाच फुटांची गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सुमारे सात हजार रुपये खर्च येत असल्याचे मूर्तिकार भगवान सळवणे यांनी सांगितले. मूर्तीची उंची आणि त्यावरील सजावट वाढत जाईल, त्याप्रमाणे तिची किंमतही वाढत जाते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध आकारांच्या मूर्तींची मागणी वाढत असल्याने मूर्तिकारांकडून दिवस-रात्र काम सुरू आहे. अनेक मूर्तींची आगाऊ नोंदणी करण्यात आली असून, परराज्यातील ग्राहकांकडूनही मागणी येत असल्याने मूर्तिकारांचा उत्साह वाढला आहे.

मजूर मिळेनात; कुटुंबातील सदस्यांवरच कामाचा भार

चौकट : मजूर मिळेनात

मूर्ती तयार करण्याच्या कामासाठी कुशल कारागिरांची मोठी गरज असते. मात्र, सध्या मजूर मिळणे कठीण झाले असून, उपलब्ध मजुरांकडून वाढीव मजुरीची मागणी केली जात असल्याने मूर्तिकारांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. घरातील सात-आठ सदस्य मूर्ती तयार करण्याच्या कामात सहभागी असतानाही अतिरिक्त कामगारांची गरज भासते. मात्र, महागाई वाढल्याने रोजंदारी वाढवून देण्याची मागणी कामगारांकडून होत असल्याने खर्चाचा ताण वाढत आहे.
त्यामुळे अनेकदा घरातील सदस्यच सकाळपासून रात्रीपर्यंत मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त राहत आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तींचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल्या परीने योगदान देत आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी लोह्यातील मूर्तिकारांनी आकर्षक आणि विविध आकारांच्या मूर्ती तयार केल्या असून, यंदा परराज्यातूनही मिळत असलेली मागणी ही लोह्यातील गणेशमूर्ती कलेची वाढती लोकप्रियता अधोरेखित करणारी ठरत आहे.

Ad 1
Previous Post

यावलमधील ‘ते उद्यान’ पुन्हा चर्चेत; निधी, कामाच्या प्रगतीवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

Next Post

🏆 प्रा. विपुल गोसावी यांना ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
🏆 प्रा. विपुल गोसावी यांना ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

🏆 प्रा. विपुल गोसावी यांना ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In