• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद
0
SHARES
77
VIEWS
Ad 1
Ad 1

खेडकरवाडीत ग्रामस्थांकडून भव्य नागरी सत्कार

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

लोहा प्रतिनिधी :- हणमंत पांचाळ

प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या कार्याची सुरुवात करून राज्याच्या शिक्षण संचालकपदापर्यंत उल्लेखनीय वाटचाल करणारे डॉ. गोविंद नांदेडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात ३८ पदव्या आणि सात सुवर्णपदके मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक कामगिरीची नोंद इंग्लंडच्या लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेडकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने डॉ. नांदेडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे संस्थापक तथा सेवा जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी एकनाथ ऊर्फ अनिल मोरे, उपशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड आणि सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सर्जेराव टेकाळे उपस्थित होते.
याप्रसंगी गावातील मा. सरपंच बाबूसराव नेळगे, माजी चेअरमन रामराव खेडकर , मारोतराव नागसाखरे, माजी सैनिक माधव झरे, कैलास नागसाखरे, गणेश खेडकर, बालाजी नागसाखरे, नामदेव कारेगावकर, माधव दगडगावे, पोलीस पाटील शिवानंद खेडकर, विश्वनाथ नेळगे, बसवेश्वर नेळगे, लक्ष्मण नागसाखरे, संभाजी खेडकर, धोंडीराम खेडकर, आपाराव नेळगे, गुंडेराव खेडकर,लक्ष्मण मारवाडे, गुणाजी खिचडे,राजु बारोळे, माधव स्वामी,सोमनाथ नेळगे,संदिप नागसाखरे,गंगाधर नेळगे,,अशोक खेडकर, बापुराव नागसाखरे, रावसाहेब नेळगे, शिवा खेडकर,उपस्थित होते.

डॉ. गोविंद नांदेडे यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या सेवाकार्याला सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी राज्याच्या शिक्षण संचालकपदापर्यंत मजल मारली.
सेवाकाळासोबतच शिक्षणाची अखंड साधना सुरू ठेवत त्यांनी विविध १२ विद्यापीठं ३०४ परीक्षा ३८ पदव्या सात सुवर्णपदक मिळवले आहेत. त्यांच्या या असामान्य शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. नांदेडे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या शैक्षणिक जिद्दीतून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमास खेडकरवाडीतील ग्रामस्थ, नागरिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी एकनाथ मोरे, उपशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड, सर्जेराव टेकाळे, यांची भाषणे झाली, प्रास्ताविक बालाजी नागसाखरे यांनी तर आभारप्रदर्शन आनंद वाळके यांनी केले. तर सुत्रसचालन विक्रम कदम यांनी केले.

चौकट

शिक्षणाच्या बाबतीत जागरुक गाव

खेडकरवाडी गाव शिक्षणाच्या बाबतीत जागरुक गाव आहे, येथील अनेक तरुण विविध क्षेत्रात नोकरीत कार्यरत आहेत, जागरुक पालकांमुळे शाळेत गुणवत्ता असुन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी अशा कार्यक्रमांचे आयोजन गावात केले जाते, त्याचाच भाग म्हणून हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, डॉ गोविंद नांदेडे यांनीही निर्वयसनी राहा, शिक्षणाची कास धरा, अधिकारी व्हा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

चौकट

फुकट राशन नको.. शिक्षण द्या – प्रा धोंडे

यावेळी प्रा. मनोहर धोंडे यांनी अध्यक्षीय समारोपातुन डॉ. गोविंद नांदेडे यांचा कार्याचा गौरव करताना सध्याच्या शिक्षण पद्धतीवर टीकास्त्र सोडले सध्या सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर शिक्षणाचा खर्च गेला असून शासन 80 कोटी लोकांना फुकट राशन वाटल्याची डिंगोरी पेटत आहे मात्र फुकट राशन पेक्षा फुकट शिक्षण देणे सध्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Ad 1
Previous Post

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

Next Post

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
28
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
39
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In