• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाने फिरवली पाठ; शेतात उभे सोयाबीन सुकले, शेतकरी संकटात!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 6, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

सोयाबीन, तूर, कापूस, हळद, मूग व ऊस पिकांवर पावसाअभावी संकट; रोग-किडींच्या प्रादुर्भावाची भीती

प्रतिनिधी | चातारी : पावसाने गेल्या काही दिवसांपासून दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी काही भागातील सोयाबीन पीक सुकून गेले असून, शेतात उभ्या पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. ऐन हंगामात पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोयाबीन पिकाला सध्या पाण्याची नितांत गरज असताना पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीनची पाने वाळून पिके कोमेजत आहेत. फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेतील पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

RelatedPosts

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

यासोबतच तूर, कापूस, हळद, मूग आणि ऊस या पिकांवरही पावसाअभावी परिणाम होत आहे. हवामानातील बदल आणि पिकांवरील ताणामुळे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. मुळकूज, खोडकूज, चारकोल रॉट, पिवळा मोझॅक, मर, कंदकूज आणि पानांवरील ठिपके यांसारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी, चक्री भुंगा, खोडमाशी, शेंगा पोखरणारी अळी आणि बोंडअळी यांसारख्या किडींच्या प्रादुर्भावाचीही भीती व्यक्त होत आहे.

पावसाचा खंड आणखी काही दिवस कायम राहिल्यास पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढू शकतात. त्यामुळे संबंधित कृषी विभागाने पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

दरम्यान, पिकांची सद्यस्थिती पाहता शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच पिकांचे व्यवस्थापन करावे, तसेच रोग-किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी!
ऐन हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. पावसाने लवकर हजेरी लावून पिकांना जीवदान द्यावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Previous Post

जळकोट शहरातील डांबरी रस्त्यावर वानराचा मृत्यू; नागरिकांकडून विधीपूर्वक अंत्यसंस्कार

Next Post

पाचोरा उर्दू केंद्र स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन

Related Posts

Blog

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

September 6, 2026
1
Blog

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

September 6, 2026
1
Blog

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

September 6, 2026
3
Blog

गटाराचे सांडपाणी रस्त्यावर; पाइपलाइन रोडवरील नागरिक त्रस्त

September 6, 2026
5
Blog

परतूर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या २८ गोवंशांची सुटका

September 6, 2026
1
Blog

पाचोरा उर्दू केंद्र स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन

September 6, 2026
1
Next Post

पाचोरा उर्दू केंद्र स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन

ताज्या बातम्या

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

September 6, 2026

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

September 6, 2026

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In