• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकसंग्रहक नेता ; माजी मंत्री बबनराव पाचपुते

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर स्वतःच्या कार्यकर्तृत्वान आणि अफाट जनसंपर्काच्या बळावर एक अढळ स्थान निर्माण करणारे जेष्ठ नेते ,माजी मंत्री आदरणीय बबनराव पाचपुते (दादा) काष्टी तालुका श्रीगोंदा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहचला आहे. केवळ नेतृत्वगुण आणि जनसामान्यांशी असलेली नाळ यांच्या बळावर त्यांनी चार दशकाहून अधिक काळ जनमानसावर अधिराज्य गाजवले आहे.

संघर्षातून उगम पावलेले नेतृत्व

RelatedPosts

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात विसर्जन मार्गांची संयुक्त पाहणी

गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मार्गावरील खड्डे आणि अडथळे तातडीने दूर करा

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना मानाचा ‘राजर्षी शाहू सन्मान २०२६’ प्रदान

तरुण वयात आईच्या इच्छेनुसार वकील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बबनराव दादांचे महाविद्यालयीन जीवन अहमदनगर मध्ये सुरू झाले. तेथेच त्यांच्यातील संवेदनशील नेतृत्वाची पहिली ठिणगी पडली. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधील भेदभाव आणि फी माफीचे आंदोलन यामुळे ते विद्यार्थ्यांचे नेते बनले. कॉलेजचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी पहिली निवडणूक जिंकली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाची पायाभरणी झाली.

1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत निवडून येत त्यांनी श्रीगोंद्याच्या विकासाचे नवे पर्व सुरू केले. गृहराज्यमंत्री , वनमंत्री, आदिवासी विकास मंत्री अशा अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी प्रशासनावर आपली मजबूत पकड दाखवून दिली .1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

2019 मध्ये त्यांनी श्रीगोंद्यात पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलवले आणि 2024 च्या निवडणुकीत सुपुत्र विक्रम पाचपुते यांच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करून त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवले.

विकासाचा ध्यास आणि शैक्षणिक क्रांती

श्रीगोंदा तालुक्याला दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी कुकडीच्या पाण्याचा प्रश्न असो की स्थानिक पायाभूत सुविधा ,दादांनी नेहमीच आक्रमकपणे आणि दूरदृष्टीने काम केले. राजकारणासोबत त्यांनी ग्रामीण भागातील मुला – मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘ परिक्रमा ‘ ( Hon.Babanrao Pachpute Vichardhara Trust ) सारख्या शिक्षण संस्थेची उभारणी करून शैक्षणिक क्रांती घडवून आणली.

‘ माणूस ‘ जपणारा लोकनेता
मंत्रिपदाचा दिवा असो वा नसो ,बबनराव पाचपुते दादांच्या वागण्या बोलण्यात आणि जनसंपर्कात कधीही बदल झाला नाही .सामान्य माणसाच्या सुख – दुःखात धाऊन जाणे,रात्री अपरात्री केंव्हाही फोनवर सहज उपलब्ध असणे आणि अडकलेल्या कामांना मार्ग दाखवणे हा त्यांचा स्थायीभाव आहे.विरोधक असला तरी त्याला संकटसमयी मदत करण्याची त्यांची वृत्ती त्यांना खऱ्या अर्थाने ‘ लोकसंग्रहक नेता ‘ बनवते.

आजही तितक्याच उत्साहाने लोकांमध्ये रमणारे आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या रूपाने नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे दादा म्हणजे श्रीगोंद्याचा ऊर्जास्रोत आहेत.

अशा या लोकशाहीच्या खंद्या शिलेदाराला आणि जनसामान्यांच्या जनकास नऊ सप्तेबर या दिवशी म्हणजेच वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेछा! दादांना उदंड ,निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

Previous Post

श्रीगोंद्यात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना मानाचा ‘राजर्षी शाहू सन्मान २०२६’ प्रदान

Related Posts

Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात विसर्जन मार्गांची संयुक्त पाहणी

September 8, 2026
0
Blog

गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मार्गावरील खड्डे आणि अडथळे तातडीने दूर करा

September 8, 2026
0
Blog

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना मानाचा ‘राजर्षी शाहू सन्मान २०२६’ प्रदान

September 8, 2026
3
Blog

श्रीगोंद्यात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

September 8, 2026
5
Blog

श्रीगोंद्यात आमदार विक्रम पाचपुते यांच्या ‘जनता दरबारा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
0
Blog

रायगड जिल्हा पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पेणचे कल्पेश ठाकूर ‘जीवनदूत’ पुरस्काराने सन्मानित

September 8, 2026
6
Next Post

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना मानाचा ‘राजर्षी शाहू सन्मान २०२६’ प्रदान

ताज्या बातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात विसर्जन मार्गांची संयुक्त पाहणी

September 8, 2026

गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मार्गावरील खड्डे आणि अडथळे तातडीने दूर करा

September 8, 2026

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना मानाचा ‘राजर्षी शाहू सन्मान २०२६’ प्रदान

September 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In