• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मार्गावरील खड्डे आणि अडथळे तातडीने दूर करा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

‘अन्याय निवारण समिती’चे आजरा नगरपंचायतीला निवेदन; आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कारवाईची मागणी

आजरा | प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायत हद्दीतील गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गांची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच मार्गावरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि भटकी जनावरे यांसारखे अडथळे त्वरित दूर करावेत, अशी मागणी सामाजिक सेवा प्रतिष्ठान संचलित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. “आम्हाला आश्वासने नकोत, त्वरित प्रत्यक्ष कारवाई हवी,” असा ठाम पवित्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

RelatedPosts

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

निवेदनात नमूद केल्यानुसार, आजरा शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील गणेशमूर्ती कुंभार गल्ली येथून नेल्या जातात. ग्रामीण भागातील मूर्ती गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, तर शहरातील मूर्ती गणेश चतुर्थीच्या दिवशी नेल्या जात असल्याने कुंभार गल्लीसह आगमन व विसर्जन मार्गांवर भाविक आणि वाहनांची मोठी गर्दी होते.

शहरातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असली तरी काही ठिकाणी रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. रस्त्यांवरील खड्डे तसेच पसरलेली खडी यामुळे गणेशमूर्ती वाहून नेणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.

समितीच्या प्रमुख मागण्या

  • गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गांची तातडीने संयुक्त पाहणी करावी.
  • अपूर्ण रस्त्यांच्या ठिकाणी मुरूम टाकून खड्डे त्वरित बुजवावेत.
  • संपूर्ण मार्गावरील अतिक्रमणे व अनधिकृत पार्किंगवर तात्पुरती बंदी घालावी.
  • गणपती आगमन मार्गावरील भटके घोडे, गाई व इतर जनावरांमुळे होणारे अडथळे तातडीने दूर करावेत.
  • वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नगरपंचायत व पोलीस विभागाने संयुक्त नियोजन करावे.
  • विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळांची स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था वेळेत पूर्ण करावी.

गणेशोत्सव हा सर्वांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), उपाध्यक्ष गौरव देशपांडे, सचिव पांडुरंग सावंतकर, नगरसेविका डॉ. सौ. स्मिता परळकर, संजय जोशी, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, अभिजीत संकपाळ, अतुल पाटील, संतोष बांदिवडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना मानाचा ‘राजर्षी शाहू सन्मान २०२६’ प्रदान

Next Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात विसर्जन मार्गांची संयुक्त पाहणी

Related Posts

Blog

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

September 8, 2026
0
Blog

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

September 8, 2026
2
Blog

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

September 8, 2026
3
Blog

माजी सरपंच राजश्री लाड यांच्या कार्यकाळासह प्रशासकांच्या कारभाराची चौकशी करा

September 8, 2026
3
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात विसर्जन मार्गांची संयुक्त पाहणी

September 8, 2026
0
Blog

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना मानाचा ‘राजर्षी शाहू सन्मान २०२६’ प्रदान

September 8, 2026
12
Next Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात विसर्जन मार्गांची संयुक्त पाहणी

ताज्या बातम्या

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

September 8, 2026

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

September 8, 2026

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

September 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In