• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात विसर्जन मार्गांची संयुक्त पाहणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

रस्ते दुरुस्ती, विद्युत तारा-फांद्या हटविण्यासह सुरक्षा उपाययोजनांचे प्रशासनाकडून निर्देश

आजरा | प्रतिनिधी : गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित दुर्घटना घडू नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी आजरा शहरातील गणेश विसर्जन मार्गांची नगरपंचायत, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. पाहणीदरम्यान विसर्जन मार्गावरील अडचणी तातडीने दूर करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

आजरा शहर व परिसरात प्रामुख्याने परोली गोंड, शिवाजीनगर घाट, वडाचा गोंड, संताजी पूल आणि गऊळदेव गोंड या ठिकाणी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. या सर्व मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून गणेशमूर्तींची वाहतूक, भाविकांची गर्दी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

RelatedPosts

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

खड्डे बुजविण्याच्या सूचना

गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे धक्का बसू नये, यासाठी विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील इतर अडथळे दूर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

विद्युत तारा व झाडांच्या फांद्यांची पाहणी

उंच गणेशमूर्तींच्या वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारा तातडीने दुरुस्त कराव्यात. तसेच मार्गावरील झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जन घाटांवर पुरेशी विद्युत रोषणाई, बॅरिकेडिंग आणि जीवरक्षकांची व्यवस्था करण्याबाबतही प्रशासनाने निर्देश दिले.

गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पार्किंग तसेच वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

खोल पाण्यात जाणे टाळण्याचे आवाहन

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे म्हणाले, “विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी सर्व विभागांनी संयुक्त पाहणी केली आहे. विसर्जनावेळी नागरिकांनी अतिउत्साह दाखवून खोल पाण्यात जाऊ नये. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांनी योग्य समन्वय ठेवून गर्दीचे नियोजन करावे.”

शिवाजीनगर तरुण मंडळाची १५ ते २० वर्षांची परंपरा

स्थानिक व्यवस्थेबाबत माहिती देताना नाथा देसाई यांनी सांगितले की, “शिवाजीनगर तरुण मंडळाचे सुमारे ३० ते ४० पट्टीचे पोहणारे कार्यकर्ते नदीत साकव व तरफा बांधून विसर्जनाची जबाबदारी घेतात. तहसील कार्यालयाकडून त्यांना लाईफ जॅकेट्स पुरवले जातात. बाप्पाच्या मूर्तीला कोणतीही इजा न पोहोचवता विसर्जन करण्याची ही परंपरा मंडळ गेल्या १५ ते २० वर्षांपासून यशस्वीपणे राबवत आहे.”

या संयुक्त पाहणीदरम्यान मुख्याधिकारी सुरज सुर्वे, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, नगरपंचायतीचे आरोग्य अधिकारी अमर कांबळे, महावितरणचे सहाय्यक अभियंता कृष्णा कोळी, मुख्य लाईनमन संतोष डोंगरे, पोलीस विभागाचे अनंत देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मार्गावरील खड्डे आणि अडथळे तातडीने दूर करा

Next Post

माजी सरपंच राजश्री लाड यांच्या कार्यकाळासह प्रशासकांच्या कारभाराची चौकशी करा

Related Posts

Blog

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

September 8, 2026
0
Blog

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

September 8, 2026
2
Blog

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

September 8, 2026
3
Blog

माजी सरपंच राजश्री लाड यांच्या कार्यकाळासह प्रशासकांच्या कारभाराची चौकशी करा

September 8, 2026
3
Blog

गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मार्गावरील खड्डे आणि अडथळे तातडीने दूर करा

September 8, 2026
0
Blog

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना मानाचा ‘राजर्षी शाहू सन्मान २०२६’ प्रदान

September 8, 2026
12
Next Post

माजी सरपंच राजश्री लाड यांच्या कार्यकाळासह प्रशासकांच्या कारभाराची चौकशी करा

ताज्या बातम्या

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

September 8, 2026

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

September 8, 2026

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

September 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In