• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
48
VIEWS
Ad 1
Ad 1

बोथडी खु. येथील ग्रामस्थांची सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; चौकशी व कारवाईची मागणी

किनवट | प्रतिनिधी : किनवट तालुक्यातील बोथडी खु. येथील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांकडून अभियंता हर्षद तेलंग यांच्यामार्फत प्रत्येक घरकुलामागे १० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार साद करून चौकशी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

बार्शीच्या मेघा व्हानकळस यांचा ‘बिग एक्स्पो २०२६’मध्ये गौरव!

या तक्रारीवर रिपब्लिकन सेनेचे माजी मराठवाडा विभागीय सचिव राजेंद्र शेळके, माजी जिल्हा उपाध्यक्ष मारोती गायकवाड, किनवट-माहूर विधानसभा प्रमुख कांता दराडे, शिवराज मुंडे, तालुका सचिव श्याम बेरडवार, यादव धनवे, जीवा गादेकर, सुनील पाईकराव, बालाजी गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, बालाजी तलांडे, संतोष टाळंमवाड, गजानन गेडाम आणि खंडू दराडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तक्रारीनुसार, बोथडी खु. येथील रहिवाशांची घरकुल मंजुरी यादी सन २०२३-२४ नुसार तयार करण्यात आली आहे. मात्र, अभियंता हर्षद तेलंग यांच्याकडून कथित आर्थिक मागणी केली जात असल्याने काही लाभार्थ्यांची घरकुले अद्याप पूर्णत्वास आलेली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक देयकाच्या मंजुरीसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट

प्रति घरकुल १० हजार रुपये मागितले जात असल्याचा आरोप असून, काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या देयकासाठी पैसे दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित लाभार्थी मजूर व भूमिहीन शेतमजूर असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक मागणीमुळे त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या प्रकरणाची तातडीने व निष्पक्ष चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पात्र लाभार्थ्यांची घरकुलाची देयके कोणतीही बेकायदेशीर कपात न करता अदा करावीत, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, या तक्रारीची प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतर नेमके काय तथ्य समोर येते आणि संबंधितांवर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे बोथडी खु. ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

माजी सरपंच राजश्री लाड यांच्या कार्यकाळासह प्रशासकांच्या कारभाराची चौकशी करा

Next Post

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

Related Posts

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!
Blog

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

October 27, 2026
2
फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!
Blog

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

October 27, 2026
2
बार्शीच्या मेघा व्हानकळस यांचा ‘बिग एक्स्पो २०२६’मध्ये गौरव!
Blog

बार्शीच्या मेघा व्हानकळस यांचा ‘बिग एक्स्पो २०२६’मध्ये गौरव!

October 26, 2026
10
Blog

बिबट्याच्या दहशतीने भालगाव परिसरातून ऊसतोड कामगारांचे स्थलांतर!

October 26, 2026
9
दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!
Blog

दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!

October 26, 2026
16
श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न
Blog

श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न

October 26, 2026
6
Next Post

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

ताज्या बातम्या

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

October 27, 2026
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

October 27, 2026
फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

October 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In