• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची शेतकऱ्यांना माहिती

सुकळी, ता. मुक्ताईनगर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी मौजे सुकळी येथे श्री. माणिक युवराज पाटील यांच्या प्रक्षेत्रावर दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री. अभिजीत शिंदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथील श्री. किरण मांडवडे यांनी गायी-म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसायातील नियोजन तसेच कुक्कुटपालनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

RelatedPosts

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

पशुधन विकास अधिकारी श्री. सलीम तडवी यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर व शाश्वत करण्यासाठी पशुधनाचे योग्य संगोपन, व्यवस्थापन आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिमित्र श्री. गजानन पाटील यांनी केले. यावेळी मुक्ताईनगर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वागती मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन श्री. युवराज पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. विनोद सैदाणे यांनी केले.

यावेळी गावातील उपसरपंच, पोलीस पाटील, प्रगतिशील शेतकरी तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालनासंदर्भातील विविध बाबी जाणून घेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.

Tags: Dyaneshwar Salwe
Previous Post

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

Next Post

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Related Posts

Blog

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026
3
Blog

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026
0
Blog

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

September 8, 2026
2
Blog

विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

September 8, 2026
3
Next Post

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

ताज्या बातम्या

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In