• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

कपेवंचा येथील घटनेने खळबळ; मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशीची मागणी

अहेरी (गडचिरोली) | प्रतिनिधी : अहेरी तालुक्यातील कपेवंंचा येथे नियमित लसीकरणानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या पवन शामराव तलांडी या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

लसीकरणानंतर प्रकृती बिघडल्याचा पालकांचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, कपेवंचा येथील पवन तलांडी या बाळाला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लसीकरण केले. बाळाचे वडील शामराव तलांडी यांच्या म्हणण्यानुसार, बाळाला चार इंजेक्शन्स आणि दोन प्रकारची औषधे देण्यात आली होती. लसीकरणानंतर काही वेळातच बाळाला तीव्र ताप आला आणि त्याची प्रकृती बिघडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

RelatedPosts

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

यानंतर कुटुंबीयांनी परमिली आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र कोडसेपल्ली येथील आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले. रात्री सुमारे ८ वाजता बाळ झोपले. मात्र, मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास आई सुनीता तलांडे यांना बाळामध्ये हालचाल जाणवली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित

बाळाची हालचाल थांबल्याचे लक्षात आल्यानंतर वडिलांनी गाव पाटील कोत्ता मंगरू आत्राम आणि आशा वर्कर सुशीला मडावी यांना माहिती दिली. त्यानंतर बाळाला रुग्णवाहिकेतून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

मृत्यूचे कारण अधिकृत अहवालानंतर स्पष्ट होणार

लसीकरणानंतर बाळाची प्रकृती बिघडल्याचा कुटुंबीयांचा दावा असला, तरी बाळाचा मृत्यू लसीकरणामुळेच झाला की अन्य कोणत्या वैद्यकीय कारणामुळे, हे शवविच्छेदन, वैद्यकीय तपासणी आणि अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेची आरोग्य विभागाने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी कुटुंबीयांसह येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष नागेश मडावी यांनी केली आहे.

घटनेची अधिकृत चौकशी करून वैद्यकीय अहवालाच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात यावे, अशी अपेक्षा कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

Next Post

विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा

Related Posts

Blog

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026
3
Blog

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026
0
Blog

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

September 8, 2026
2
Blog

विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

September 8, 2026
3
Next Post

विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा

ताज्या बातम्या

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In