• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

आमदार रणधीर सावरकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या

प्रतिनिधी :

RelatedPosts

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

अकोला : विदर्भातील खरीप हंगामावर अनियमित पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

विदर्भात जून आणि जुलै महिन्यात अत्यल्प व खंडित पाऊस झाल्याने पेरणीला विलंब झाला. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह विविध खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाल्याने पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला असल्याचे सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यापूर्वी ३१ जुलै रोजी पीक विमा अर्जाची मुदत वाढविण्याची मागणी आपण केली होती. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार सावरकर यांनी त्यांचे आभार मानले. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता केवळ पीक विम्याची मुदतवाढ पुरेशी नसून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सावरकरांच्या प्रमुख मागण्या

  • नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.
  • पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी.
  • पीक विम्याच्या कक्षेबाहेरील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
  • सोयाबीनसह सर्व नुकसानग्रस्त पिकांना हेक्टरी विशेष मदत द्यावी.
  • पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करावे.
  • पुढील हंगामासाठी बियाणे, खते व अन्य निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना मदत द्यावी.
  • जनावरांसाठी चारा डेपो सुरू करून पाण्याची व्यवस्था करावी.
  • पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू करावेत.
  • विदर्भातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी.

शेतकरी चळवळीतून पुढे आलेले आणि स्वतः शेतकरी असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या भावना, समस्या आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षा सातत्याने सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण करत असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले.

पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती वेगवेगळी असली तरी अनेक भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. वर्धा तसेच विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करतील आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देतील, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.

Previous Post

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Next Post

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

Related Posts

Blog

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026
3
Blog

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026
0
Blog

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

September 8, 2026
2
Blog

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

September 8, 2026
3
Blog

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

September 8, 2026
3
Next Post

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

ताज्या बातम्या

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In