नेवासा प्रतिनिधी:
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या नेवासा तालुक्यातील गुरुजनांचा गौरव वाढवणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नेवासा तालुका ‘ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघाच्या’ अध्यक्षपदी सुरेगाव (गंगा) येथील जि.प. प्राथमिक शाळेचे, हसतमुख व कर्तव्यकठोर मुख्याध्यापक हरिभाऊ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नेवासा तालुक्यासह सुरेगाव (गंगा) परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
माजी अध्यक्ष व शिक्षक संघटनेचे राज्य नेते कल्याणराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये हरिभाऊ जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली असून, कार्याध्यक्षपदी गणेश शेलार तर सचिव पदाची जबाबदारी आसिफ शेख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि कर्तृत्व पाहताच ही निवड योग्य व्यक्तीच्या हाती योग्य जबाबदारी देणारी ठरली आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हरिभाऊ जाधव यांच्या या प्रेरणादायी निवडीबद्दल सुरेगाव (गंगा) येथील जि.प. प्रा. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा अत्यंत उत्साहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पारखे(खिर्डी) भागवत चितळकर,शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे, पत्रकार प्रल्हाद शिंदे, अंकुश शिंदे, लक्ष्मण शिंदे, प्रा.पुराने सर,गोविंद माळवे, विठ्ठलअप्पा शिंदे, बाळकृष्ण शिंदे व सर्व शिक्षक वृंद यांच्यासह गावातील अनेक माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.हरिभाऊ जाधव यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या भावी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक जाधव सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.











