वर्धा, दि. ९ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कार्यकारणी सदस्यपदी स्वप्नील ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोजभाई चव्हाण यांनी ही नियुक्ती केली.
वर्धा विश्रामगृह येथे दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे व जिल्हापाध्यक्ष नितीन अमृतकर यांच्या हस्ते स्वप्नील ठाकरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी वर्धा शहर संघटक नितीन जुमडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वप्नील ठाकरे यांच्या नियुक्तीमुळे वर्धा जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी तसेच कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक जोमाने काम केले जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
नवनियुक्त कार्यकारणी सदस्य स्वप्नील ठाकरे यांचे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात आले.











