
मोहदा =बंजारा समाजाची काशी, तीर्थक्षेत्र पोहरादेवी हॆ बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहे. याच पवित्र स्थळी उभारण्यात आलेल्या नंगारा भवणाचे उदघाटन 5आक्टोबरला देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदि यांच्याहस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे सक्षिदार व्हावे असे आव्हान शिवशेना युवा शेना कळब तालुका अध्यक्ष दादूशिंग आडे यांनी केले आहे.
बंजारा समाजाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, त्याना आपल्या समृद्ध संस्कृती ची जाणीव व्हावी यासाठी पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड अथक प्रयत्ननी ”विरासत ए बंजारा ”संग्रालय उभारले जात आहे. हॆ सग्रहलंय बंजारा समाजाचा इतिहास जतन करण्याचे एक महान कार्य ठरणार आहे.
बंजारा समाजाच्या विविध ऐतिहासिक घटनाचे चित्रण व देखावे येथे साकरण्यात आले आहेत. समाजाच्या इतिहासाची संपूर्ण कहाणी या संग्रहलयाच्या माध्यमातून उलगडली जाईल हा सोहळा मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री संजय राठोड
यांच्या उपस्थितीत होणार आहे. याशिवाय अनेक साधू -संत, समाजातील प्रमुख वेक्ती व बंजारा समाज इतर मान्यवर साक्षीदार असतील या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन युवा शेना तालुका अध्यक्ष दादूसींग आडे यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.
Discussion about this post