
मेटीखेडा -शेत शिवारात 1किमी पश्चिम दिशेला दि. 29/09/2024रोजी रात्री 9.30च्या दरम्यान खेकडे पकडण्या साठी गेलेला प्रवीण कोकांडे यांचा मृत्यू सविस्तर वुत्त यांचे मोठे भाऊ श्री. संतोष नामदेव कोकांडे रा. मेटीखेडा यांनी वडगाव (जंगल)पो. स्टेशन ला दिलेल्या जबानी रिपोर्ट दि. 2/10/2024रोजी पोलीस स्टेशन ला हजर राहून जबानी रिपोर्ट दिला.
येणे प्रमाणे माझ्या घराच्या शेजारी माझा लहान भाऊ मृतक प्रवीण नामदेव कोकांडे वय 39वर्ष हा त्याचं दोन मित्र यांच्या सोबत खेकडे पकडण्या करिता पार्डी गावाच्या नाल्यावर गेले होते परंतु येते वेळी अंदाजे रात्री 9.00वा. दरम्यान गट. नं 20क्षेत्र 1हॆ 62आर शेतामध्ये शेतीला जंगली प्राण्यापासून मालाचे नुकसान न होणे करिता विधुत पुरवठा असलेल्या शेतीला अवैध्यरित्या करंट कुंपणाला लोखंडी तार लावला होता व त्या ताराला करंट सप्लाय सुरु होता. तेव्हा माझा भाऊ व त्याचे मित्र त्या शेतामधून जात असताना माझ्या भावाला दोन्ही पायला अंधारात स्पर्ष झाल्याने त
त्याला लोखंडी ताराचं करंट लागून तो खाली बेशुद्ध पडला तेव्हा त्याचा सोबत गेलेली मित्र माझ्या घरी येऊन त्याने मला ही घटना सांगितलं मी घटनास्थळी पोहोचलो व माझ्या भाऊ ला उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मेटीखेडा येथे नेले असता माझ्या भावाला शा. रु.
यवतमाळ येथे नेऊन भरती केले असता डाँक्टरांनी माझ्या भावाला तपासून मूत घोषित केले सदर प्रकरणी फिर्यादी संतोष नामदेव कोकांडे यांच्या दिलेल्या तक्रारी वरून अप. क्र. 293/2024कलम 105,3(5)BNS गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास वडगाव (जंगल )बिट जामदार श्री. गणेश आगे करीत आहे.
Discussion about this post