• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धनगरवाडी येथे महापोषण अभियान उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

गरोदर व स्तनदा मातांना पोषण, आरोग्य आणि संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन

धडगाव प्रतिनिधी

RelatedPosts

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

मालेगाव शहरात वारंवार वीज खंडित; नागरिक त्रस्त

धनगरवाडी, धुळे | दि. ९ सप्टेंबर २०२६ : समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास विभाग प्रकल्पांतर्गत महापोषण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, धुळे यांच्या सहकार्याने अंगणवाडी केंद्र क्रमांक ३, धनगरवाडी येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. राहुल जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक, मानसिक आरोग्य कार्यक्रम डॉ. उमाकांत पाटील उपस्थित होते. तसेच संजय लोटे, आरोग्य कर्मचारी, ANM मोनाली पाटणकर, अंगणवाडी सेविका मंगला गायकवाड आणि आशा वर्कर ज्योती देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अंगणवाडी सेविका मंगला गायकवाड यांनी डॉ. राहुल जाधव यांचे, विद्यार्थी विपुल वेलगा यांनी डॉ. उमाकांत पाटील यांचे, विद्यार्थिनी पठाण मुस्कान यांनी ANM मोनाली पाटणकर यांचे, विद्यार्थिनी नदीम पटेल यांनी संजय लोटे यांचे, तर विद्यार्थिनी रूपाली ठाकरे यांनी आशा वर्कर ज्योती देवरे यांचे स्वागत केले.

यानंतर ANM मोनाली पाटणकर यांनी गरोदर माता व स्तनदा मातांना पोषण, आरोग्याची काळजी, संतुलित आहार तसेच माता-बाल आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे डॉ. उमाकांत पाटील यांनी पोषणाचे महत्त्व, मानसिक आरोग्य आणि कुटुंबातील आरोग्यविषयक जागरूकता याबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. राहुल जाधव यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य पोषण, स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी आणि आरोग्याची सातत्याने काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. महापोषण अभियानाच्या माध्यमातून समाजात पोषण व आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास गरोदर माता, स्तनदा माता, बालके, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी तसेच समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनी पाडवी यांनी केले, तर पठाण मुस्कान यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, माता, बालके तसेच समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी आणि उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाच्या आयोजनात पटेल अमीन, पटेल शाबान, पठाण मुस्कान, मोनी पाडवी, पटेल नदीम, विपुल वेलगा, सोनवणे दामली, वडवी मेहक आणि वसावे रूशा यांनी सहभाग घेतला.

Tags: Vasant Pawara
Previous Post

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा; गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा

Next Post

गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करा; सपोनि संतोष जोंधळे

Related Posts

ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

मालेगाव शहरात वारंवार वीज खंडित; नागरिक त्रस्त

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

तुळजापूर तालुक्यात बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करा; सपोनि संतोष जोंधळे

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा; गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा

September 10, 2026
2
Next Post

गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करा; सपोनि संतोष जोंधळे

ताज्या बातम्या

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In