• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तुळजापूर तालुक्यात बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

अनियमित पावसामुळे खरीप पिके धोक्यात; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज

तुळजापूर : प्रतिनिधी

RelatedPosts

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

मालेगाव शहरात वारंवार वीज खंडित; नागरिक त्रस्त

तुळजापूर तालुक्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगाम अडचणीत आला असून, आता शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या सणांवरही दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. आज साजरा होणाऱ्या बैलपोळा सणावरही दुष्काळाचे संकट स्पष्टपणे जाणवण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी जेमतेम झालेल्या पावसाच्या भरवशावर पेरणी केली. त्यानंतर कर्ज काढून फवारणी, मशागत आणि खुरपणीची कामे केली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पिकांची झालेली नुकसानकारक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, अनेक शेतकऱ्यांनी शेताकडे जाणेही टाळल्याचे चित्र आहे.

एकीकडे पिकांचे नुकसान होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा भार आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा ज्येष्ठ राजकीय नेते मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळाली नाही तर त्याचा परिणाम केवळ शेतकरीच नव्हे, तर संपूर्ण जनतेवर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, नुकतीच झालेली खांदे मळणीही यंदा साधारण स्वरूपात पार पडली. दरवर्षी या काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आनंद यंदा मात्र कमी झाल्याचे चित्र आहे. आता बैलपोळा सणावरही दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बळीराजाच्या सणावरही चिंतेची छाया

बैलपोळा हा शेतकरी आणि त्याच्या पशुधनाशी जोडलेला महत्त्वाचा सण आहे. मात्र, यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे अर्थचक्रच विस्कळीत झाले असून, त्यामुळे सणाचा उत्साहही कमी झाल्याचे दिसून येत आहे. शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: Kalyan Karpe
Previous Post

गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करा; सपोनि संतोष जोंधळे

Next Post

लातूरमधील रखडलेल्या विकासकामांवरून शिवसेनेचे जनआंदोलन

Related Posts

ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

मालेगाव शहरात वारंवार वीज खंडित; नागरिक त्रस्त

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करा; सपोनि संतोष जोंधळे

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

धनगरवाडी येथे महापोषण अभियान उत्साहात संपन्न

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा; गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा

September 10, 2026
2
Next Post

लातूरमधील रखडलेल्या विकासकामांवरून शिवसेनेचे जनआंदोलन

ताज्या बातम्या

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In