• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 11, 2026
in Blog
0
आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

५८८ शासकीय व सुमारे ५०० अनुदानित आश्रमशाळांमधील अन्नधान्याची तातडीने तपासणी करा

RelatedPosts

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज दि. ८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन आमदार रणधीर सावरकरांनी विदर्भातील खरीप हंगामातील निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली – शेतकऱ्यांच्या समस्या मांडून मदतीचे विशेष पॅकेज द्या, आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आदिवासी विद्यार्थी संघ–विदर्भ नागपूरचे सरसेनापती नंदुभाऊ नरोटे व गडचिरोली जिल्हाध्यक्ष विलासभाऊ नरोटे यांचे निवेदन

प्रतिनिधी : सुगत उराडे
9 सप्टेंबर 2026

गडचिरोली : महाराष्ट्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य तसेच शुद्ध पाण्याचा अभाव यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी संघ–विदर्भ नागपूर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अखत्यारितील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये हजारो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे अन्नधान्य अनेक ठिकाणी अत्यंत निकृष्ट प्रतीचे असून ते विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा दावा संघटनेने निवेदनातून केला आहे.

अन्नधान्याच्या गुणवत्तेची शासकीय पातळीवर तपासणी करण्याची मागणी

निवेदनानुसार, राज्यातील ५८८ शासकीय आश्रमशाळांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. तसेच राज्यात जवळपास ५०० अनुदानित आश्रमशाळा आहेत. या सर्व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता, साठवणूक, वितरण व्यवस्था आणि प्रत्यक्ष वापर यांची स्वतंत्र व काटेकोर तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासकीय आश्रमशाळांना अन्नधान्य पुरवठा करणारी एजन्सी केंद्रीय भांडार, मुंबई असून, त्यांच्याकडून पेट कंत्राटाद्वारे अन्नधान्याचा पुरवठा केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, अनुदानित आश्रमशाळांमध्ये संस्था प्रमुखांकडून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

शुद्ध पाण्याचा प्रश्नही गंभीर

केवळ अन्नधान्यच नव्हे, तर अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. निकृष्ट अन्न आणि अशुद्ध पाण्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अन्न व आरोग्याच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाऊ नये. त्यामुळे राज्यातील ५८८ शासकीय व सुमारे ५०० अनुदानित आश्रमशाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात यावी. अन्नधान्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून दोष आढळल्यास संबंधित पुरवठादार, संस्था व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून, आश्रमशाळांतील अन्नव्यवस्थेत पारदर्शकता व गुणवत्तेची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे..

Previous Post

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज दि. ८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन आमदार रणधीर सावरकरांनी विदर्भातील खरीप हंगामातील निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली – शेतकऱ्यांच्या समस्या मांडून मदतीचे विशेष पॅकेज द्या, आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

Related Posts

Blog

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

September 11, 2026
0
बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?
Blog

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

September 11, 2026
5

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
20
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
24
Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
50
Next Post
बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

ताज्या बातम्या

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

September 11, 2026
बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

September 11, 2026
आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

September 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In