• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 11, 2026
in Blog
0
बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

बाबासाहेब कुकडे

RelatedPosts

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज दि. ८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन आमदार रणधीर सावरकरांनी विदर्भातील खरीप हंगामातील निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली – शेतकऱ्यांच्या समस्या मांडून मदतीचे विशेष पॅकेज द्या, आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज बैल पोळा…शहरातल्या अनेक लहानग्यांना हे आश्चर्य़च वाटतं की, बैलांचा देखील सण असतो. पण ग्रामीण भागात बैलांचं महत्व शेतकऱ्यांना आजही आपल्या मुलांएवढंच असतं. कारण अनेक मुलींना सासरी जाताना शेतकरी गाय देखील द्यायचे. गाय मुलीला आंदण म्हणजेच भेट दिली जात असे. ही गाय मुलीकडे सासरी पोहोचवली जायची. अर्थातच अशाच गाईंचे वासरू पुढे मोठे झाल्यावर शेतात कामासाठी जुंपले जातात. नकळत ते शेतकऱ्याच्या परिवाराचा भाग बनतात.

बैलपोळा महाराष्ट्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. आज बळीराजा बैलांना साजश्रृंगार करतात. त्यानंतर बळीराजा पोळ्याच्या कार्यक्रमात भाग घेतो. शेतात बळीराजा आणि बैल ऊन असो वा पाऊस, तरी देखील शेतात राब राब राबतात. जितका कष्ट बळीराजा घेतो तितके कष्ट, बैल देखील शेतात घेतो. श्रावण महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमीनंतर बैलपोळा हा सण येतो. श्रावणात पिठोरी अमावास्या आल्यावर हा सण साजरा केला जातो.

बैलामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे श्रम हलके होतात. आजचा दिवशी बैलाचा सन्मान करण्याचा दिवस असतो, शेतीत आजही बैलामुळे अनेक कामं होतात, जी ट्रॅक्टरने देखील करणे शक्य नाहीत. आज बळीराजा बैलाला सजवतो, विशेष म्हणजे आज बैलाला कोणत्याही कामासाठी जुंपलं जात नाही. कार्यक्रमात ढोल, ताशे वाजवत बैलांची मिरवणूक काढतात. पोळा सण महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे. या सणाच्या दिवशी बैलांचा थाट असतो. आजच्या दिवशी बैलाला कामापासून आराम असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळा या सणाच्या दिवशी बैलांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते.

बैलांची मान आणि शरीराचा जोड-खांदा हळद आणि तुपाने तेलानं शेकले जाते. त्यांच्यासाठी रंगबेरंगी वस्त्र बळीराजा आणतो. या दिवशी बैलांना चादरीसारखे आवरण घातलं जाते. संपूर्ण अंगावर नक्षीकाम गेरूचे ठिपक्यानं केलं जातं, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या हार घालतात. पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे, बांधतात. या दिवशी बैलांना खायला गोड पुरणपोळी देखील असते. आज जरी आपण तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे, तरी देखील बैलाचं महत्व बळीराजासाठी आजही कायम आहे. शेतात ट्रॅक्टरचा वापर शेतकरी करतात, मात्र छोटे शेतकरी आज देखील बैलाचा वापर करतात.

Previous Post

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

Next Post

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

Related Posts

Blog

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

September 11, 2026
0
आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!
Blog

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

September 11, 2026
0
Blog

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज दि. ८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन आमदार रणधीर सावरकरांनी विदर्भातील खरीप हंगामातील निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली – शेतकऱ्यांच्या समस्या मांडून मदतीचे विशेष पॅकेज द्या, आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

September 11, 2026
0
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
20
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
24
Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
50
Next Post

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

ताज्या बातम्या

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

September 11, 2026
बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

September 11, 2026
आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

September 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In