• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देऊळगाव-भानोस येथील शेतकऱ्यांचे पातूर तहसीलवर धडक; तात्काळ दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
देऊळगाव-भानोस येथील शेतकऱ्यांचे पातूर तहसीलवर धडक; तात्काळ दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

प्रदीप ताजने
पातूर (प्रतिनिधी)

RelatedPosts

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

पातूर तालुक्यात ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपून गेली असून बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर देऊळगाव-भानोस येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होत दि. ०९ सप्टेंबर रोजी पातूर तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना निवेदन दिले. पातूर तालुका तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

जून-जुलैमध्ये पावसाने दमदार सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर तब्बल ५० दिवसांचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद, मूग, ज्वारी ही पिके डोळ्यादेखत जळून गेली आहेत. हजारो रुपये खर्च करून, उसनवारी करून पेरलेले पीक मातीत गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी फिरवलेले आर्थिक चक्र आता सावकारकीच्या चक्रव्यूहात अडकले असून आसमानी संकटासोबतच आर्थिक संकटही उभे राहिले आहे.

जेव्हा निसर्गाची साथ सुटते तेव्हा केवळ पिकेच जळत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या आशा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब विस्कळीत होते. अशी व्यथा शेतकऱ्यांनी निवेदनात मांडली आहे. तात्काळ पिकांचे पंचनामे करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आणि हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

या निवेदनावर गजानन जगमाथ गोळे, मनोहर प्रभू उपर्वट, किशोर गोळे, भारत कैलास उपर्वट, मोहन उपर्वट, शीलवंत तेजराव उपर्वट, अविनाश ओंकार उपर्वट, गुंताबाई तेलगोटे, शांताबाई उपर्वट, छाया दीपक उपर्वट, छाया एकनाथ उपर्वट, कमलाबाई मा. उपर्वट, प्रमिला घनमोडे, आशाबाई उपर्वट, रमाबाई अंभोरे, सिलाबाई महादेव उपर्वट, विमलबाई उपर्वट यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया :

“मेहनतीने आणि उसनवारी करून पेरलेले पीक डोळ्यादेखत जळताना पाहून छाती फाटते.”
– गजानन जगमाथ गोळे, शेतकरी

“सोयाबीन पीक डोळ्यादेखत जळून खाक झालं, उरली फक्त शेतात माती आणि पाचोळा.”
– मनोहर प्रभू उपर्वट, शेतकरी

“शासनाने तात्काळ पातूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि पिकांचे पंचनामे करून प्रधानमंत्री पीक विमा आणि हेक्टरी आर्थिक मदत द्यावी.”
– शीलवंत उपर्वट, सामाजिक कार्यकर्ते

Previous Post

मुक्ताईनगर एमआयडीसीसाठी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात

Next Post

आत्महत्या हा पर्याय नाही; संवादातून संकटावर मात करा

Related Posts

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!
Blog

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
0
मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न
Blog

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

September 12, 2026
0
राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….
Blog

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

September 12, 2026
5
मालेगाव येथे उत्साहात साजरा झाला बैलपोळा; अरुणभाऊ बळी मित्र मंडळातर्फे शेतकऱ्यांना टोपी-शेल्याचे वाटप
Blog

मालेगाव येथे उत्साहात साजरा झाला बैलपोळा; अरुणभाऊ बळी मित्र मंडळातर्फे शेतकऱ्यांना टोपी-शेल्याचे वाटप

September 12, 2026
7
यावलच्या ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त, विकासकामे ‘ऑक्सिजन’वर जाण्याची भीती..!
Blog

यावलच्या ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त, विकासकामे ‘ऑक्सिजन’वर जाण्याची भीती..!

September 12, 2026
0
पारोळ्यात बैलपोळ्याला गालबोट : किरकोळ वादातून तरुणाचा खून, आरोपी फरार..!
Blog

पारोळ्यात बैलपोळ्याला गालबोट : किरकोळ वादातून तरुणाचा खून, आरोपी फरार..!

September 12, 2026
4
Next Post
आत्महत्या हा पर्याय नाही; संवादातून संकटावर मात करा

आत्महत्या हा पर्याय नाही; संवादातून संकटावर मात करा

ताज्या बातम्या

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

September 12, 2026
राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In