सुंदर सजावट केलेल्या बैलजोड्यांना रोख पारितोषिक; गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मलकागुडा : प्रतिनिधी
मलकागुडा येथील श्री हनुमान मंदिर परिसरात बुधवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी बैलपोळा सण उत्साहात, पारंपरिक पद्धतीने आणि शांततेत पार पडला. यावेळी बैलजोड्यांची आकर्षक सजावट करून त्यांचे पूजन करण्यात आले.
पोळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सजावट स्पर्धेत सर्वात सुंदर सजावट केलेल्या बैलजोड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख पारितोषिके देण्यात आली. यामध्ये प्रथम पारितोषिक ₹५,००१, द्वितीय ₹३,००१, तृतीय ₹२,००१ आणि ₹१,१०१ अशी पारितोषिके देण्यात आली.
या कार्यक्रमाला गावातील प्रसिद्ध उद्योजक श्री नितीन पाटील कनलवार, उपसरपंच श्री विश्वजी कनलवार, श्री सुमीत पाटील कनलवार, समाजसेवक कलाल गोड, अध्यक्ष श्री रविंद्र मारकवार सर तसेच गावातील सर्व समाजबांधव उपस्थित होते.
गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सणात सहभाग घेतला. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम शांततेत आणि आनंदी वातावरणात पार पडला.









