प्रतिनिधी आलोक बांडे
मालेगाव जि वाशिम
मो. नं – 9623582185
मालेगाव शहरात काल बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक चैतन्यात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अरुणभाऊ बळी मित्र मंडळातर्फे पोळ्यामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना आदराचे प्रतीक म्हणून टोपी व शेल्याचे वाटप करण्यात आले.
या सुंदर आणि पारंपरिक सोहळ्याचे आयोजन अरुणभाऊ बळी मित्र मंडळ आणि विविध मान्यवरांच्या पुढाकाराने पार पडले. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख आशिषभाऊ डहाळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप घुगे, नगरसेवक योगेश बळी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपशहर प्रमुख संतोष यादव यांच्यासह अमर रोकडे, प्रशांत लोखंडे, सय्यद गुलाब, पाटील सर, बाळा सावंत, अभिषेक देवकते, भरत गुडदे, शेख आयुब, दत्तराव पोफळे, अक्रम सर, मोहनभाऊ वानखेडे, अनुज चरखा, अनिस शेख, रामेश्वर बळी, रवी बळी, गफार शहा, धीरज कान्हेड, तुषार कान्हेड, सुशांत वाळली, निखिल बांडे, अमित डहाळे, अभिषेक बांडे, विकी रोकडे, आलोक बांडे, आणि जितेंद्र टिकाईत यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
पोळ्याच्या या सणाला गावातील मानाच्या बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये बैल जोड्या मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या सणाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार भावनाताई गवळी, तसेच नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा सन्मान करत टोपी-शेल्यांचे वाटप करणाऱ्या या उत्साही सोहळ्याने मालेगावच्या ग्रामीण संस्कृतीची व पोळ्याच्या गोडगोड वातावरणाची सुंदर झलक दाखवून दिली.













