• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आत्महत्या हा पर्याय नाही; संवादातून संकटावर मात करा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
आत्महत्या हा पर्याय नाही; संवादातून संकटावर मात करा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त विद्यापीठात रॅली, पथनाट्याद्वारे जनजागृती

RelatedPosts

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त गुरुवारी (१० सप्टेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या वतीने आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीपर विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये मानसशास्त्र विभागासह विद्यापीठातील इतर विभागांचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

अनेकदा परिस्थिती हाताबाहेर गेल्याची भावना निर्माण झाल्यानंतर विद्यार्थी किंवा तरुणांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात. काही जण त्या विचारातून आत्महत्येचा प्रयत्नही करतात. अशा वेळी व्यक्तीच्या मनातील भावना समजून घेणे, तिच्याशी संवाद साधणे आणि योग्य वेळी मदतीचा हात देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती करण्यात आली.

‘आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही’ हा संदेश देत एम.ए. मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात पथनाट्य सादर केले. तसेच रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध आणि गरजू व्यक्तींना वेळेवर मदत मिळण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी कितीही मोठ्या वाटल्या तरी त्या कायमस्वरूपी नसतात. आई-वडील, कुटुंबीय, मित्र आणि आपल्या आयुष्यातील नाती यांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अडचणींच्या काळात स्वतःला एकटे न ठेवता जवळच्या व्यक्तीशी बोलणे आणि आवश्यक असल्यास मानसशास्त्रज्ञांची मदत घेणे हा योग्य मार्ग असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातील विभाग प्रमुख अपर्णा अष्टपुत्रे मॅडम व प्राध्यापक आणि विद्यार्थी मानसिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहतील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

— अविनाश शिपे
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

Previous Post

देऊळगाव-भानोस येथील शेतकऱ्यांचे पातूर तहसीलवर धडक; तात्काळ दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

Next Post

लोणावळा शिबिरात पातूर तालुकाध्यक्ष रविकुमार तायडे यांचा सक्रिय सहभाग; वर्षाताई बगाडे यांची राज्यपदी नियुक्ती

Related Posts

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!
Blog

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
0
मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न
Blog

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

September 12, 2026
0
राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….
Blog

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

September 12, 2026
5
मालेगाव येथे उत्साहात साजरा झाला बैलपोळा; अरुणभाऊ बळी मित्र मंडळातर्फे शेतकऱ्यांना टोपी-शेल्याचे वाटप
Blog

मालेगाव येथे उत्साहात साजरा झाला बैलपोळा; अरुणभाऊ बळी मित्र मंडळातर्फे शेतकऱ्यांना टोपी-शेल्याचे वाटप

September 12, 2026
7
यावलच्या ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त, विकासकामे ‘ऑक्सिजन’वर जाण्याची भीती..!
Blog

यावलच्या ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त, विकासकामे ‘ऑक्सिजन’वर जाण्याची भीती..!

September 12, 2026
0
पारोळ्यात बैलपोळ्याला गालबोट : किरकोळ वादातून तरुणाचा खून, आरोपी फरार..!
Blog

पारोळ्यात बैलपोळ्याला गालबोट : किरकोळ वादातून तरुणाचा खून, आरोपी फरार..!

September 12, 2026
4
Next Post
लोणावळा शिबिरात पातूर तालुकाध्यक्ष रविकुमार तायडे यांचा सक्रिय सहभाग; वर्षाताई बगाडे यांची राज्यपदी नियुक्ती

लोणावळा शिबिरात पातूर तालुकाध्यक्ष रविकुमार तायडे यांचा सक्रिय सहभाग; वर्षाताई बगाडे यांची राज्यपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

मलकागुडा येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत संपन्न

September 12, 2026
राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

राजर्षी शाहू नागरी सह पतसंस्था मर्या. कुरुंदवाड.या संस्थेच्या नूतन चेअरमन पदी विजयकुमार जोंग.तर व्हा. चेअरमन पदी सौ आयेशा मिर अहमद बागवान यांची निवड….

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In