पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
प्रतिनिधी | लोहा
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने पिके सुकू लागली असून अनेक ठिकाणी पिकांची पाने पिवळी पडून करपण्याची अवस्था निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केलेली असताना पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.
पावसाची प्रतीक्षा करत शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले असून, लवकरात लवकर दमदार पाऊस पडावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.







