पाटी, पेन, वही, पाणी बॉटल व पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप; शाळेच्या प्रगतीचे मान्यवरांकडून कौतुक
लोहा प्रतिनिधी :
नायक प्रतिष्ठानच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा हरिश्चंद्र तांडा, केंद्र माळाकोळी, ता. लोहा येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ओमकार जाधव यांच्या पुढाकारातून प्रत्येक विद्यार्थ्याला पाटी, पेन, वही, पाणी बॉटल व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मन्याड दर्पण’चे पत्रकार श्री. विनोद मस्के होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजीव तिडके, शिक्षिका सौ. शोभा मुंडे तसेच गावातील तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शाळेच्या परिसरात वृक्षलागवड करून त्यांचे योग्य संगोपन केले जात असल्याचे पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. मागील वर्षी शून्य पटसंख्या असलेल्या या शाळेतील विद्यार्थीसंख्या मुख्याध्यापक संजीव तिडके व शिक्षिका सौ. शोभा मुंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनामुळे आज १८ ते २० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. शाळेतील झालेली ही प्रगती पाहून उपस्थित पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले.










