खानदेशात वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषिपंपांची वीजबिले देताना त्यावर सध्या किती दर आकारला, वीजबिल माफ केले आहे, याचे विवरण द्यावे, अशी मागणी केली जात आहे. शासनाने पाच व सात अश्वशक्तीच्या कृषिपंपांना वीजबिल माफ केले आहे.
पुढे निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर प्रशासन दखल घेणार नाही. वीजबिले भरण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. मध्यंतरी काही गावांत कृषिपंपांचे वीज संयोजनही बंद करण्याचे, नादुरुस्त रोहित्र थकबाकी भरल्याशिवाय न देण्याचे आडमुठे धोरण वीज कंपनी राबवीत होती.
शेतकरी फक्त आठ तास कृषिपंपांसाठी वीज वापररात, रोहित्र दुरुस्ती केली जात नाही, वीजपुरवठा अधूनमधून खंडित होतो, त्यात कृषिपंप कमी दाबाची वीज किंवा इतर अडचणींमुळे नादुरुस्त होतात, हा सर्व तोटा भरून शेतकऱ्यांची कृषिपंप वीजबिले दुरुस्त किंवा साधारित करून द्यावीत व वीजबिल माफीचा लाभ दिला जावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांना कृषिपंपांची वीजबिले शेतकऱ्यांना मागूनही मिळत नाहीत. खरिपाची तयारी सुरू असतानाच अनेक वर्षांनंतर बिले का दिली, बिले व्यवस्थित करून का दिली नाहीत, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
Discussion about this post