आज दि.03 ऑक्टोबर 2024 रोजी चिंतामणी म.माध्य. विद्यालय गुंज विद्यालयात तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.सदरील स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मुकेशजी राठोड(गटशिक्षणाधिकारी पाथरी) व मार्गदर्शक संस्थेचे सहसचिव श्री दगडुआप्पा पटणे हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री गिरी सर हे होते ,तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संयोजक श्री तुकाराम शेळके सर यांनी केले, तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विरकर सर व कार्यक्रमाचे आभार श्री रवींद्र धर्मे यांनी केले..तसेच या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी तालुक्यातील जवळपास सर्व नामवंत जिल्हा परिषद व सर्व संस्थाचे खेळाडू व क्रिडाशिक्षक सहभागी झाले होते..
आजच्या या स्पर्धेत 14,17,19 वर्षाखालील मुला-मुलींचे लांब उडी,उंच उडी,गोळा फेक,थाळी फेक,भाला फेल,100 मी,200 मी,400 मी,800 मी धावणे,रिले या स्पर्धा घेण्यात आल्या..तसेच या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंच व गुणलेखक म्हणून श्री गिलडा सर,श्री चिंचाने सर,श्री दुधमोगरे सर,श्री गजमल सर,श्री पोपळघट सर,श्री जाधव सर,श्री सवणे सर,श्री नखाते सर,श्री धनले सर,श्री एडके सर,श्री गव्हाणे सर,श्री पितळे सर व ईतर सर्व शिक्षक व चिंतामणी महाराज माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील कार्यक्रम व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली.
तसेच स्पर्धेमधील सर्व विजेत्या खेळाडूचे अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post