प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-शिरोळ तालुक्यातील औरवाड येथील ग्रामपंचायत औरवाड (अमरापूर)चे सरपंच सनी मंगसुळे व उपसरपंच विशाल दुग्गे यांनी दुर्गामातेकडे साकडे घातले,त्यावेळी प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की,’ दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, पाणी जपून वापरा, योग्य पाण्याचा वापर करा, देवी मातेच्या आशीर्वादाने लवकर पाऊस पडो,शासनाने लागील ती मदत करावी, लवकरच साखर कारखाने सुरु होणार आहेत, त्यांनी योग्यतो दर द्यावा, शेतकरी अडचणीत आहे.
सर्व नागरिकांना चांगले आरोग्य लाभो,गावच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अपुरे कामे लवकरा-लवकर पूर्ण करण्याकडे आमचे लक्ष असेल. देवी माता आम्हास बळ देवो, कामे करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. राजकीय पटलावरील औरवाडचे (अमरापूर)नाव नेहमी देवी समोर तेवत ठेवलेल्या पणती प्रमाणे नेहमी उजागर करू.
यावेळी उपसरपंच विशाल दुग्गे यांनी उपस्थिती राहून जनतेसाठी कल्याणकारी कामे आमच्या हातून व्हावेत यासाठी दुर्गामातेचे शुभ आशीर्वाद आमच्यावर राहोत अशी प्रार्थना केली.











