वाशी तालुका प्रतिनिधी:राजेंद्र अहिरे
दुष्काळ सदृश परिस्थितीत हतबल झालेली जनता त्यात भूम वाशी परंडा चे माजी आरोग्यमंत्री आमदार प्राध्यापक तानाजी सावंत साहेब यानी गेल्या 10 वर्षापासुन या तिन्ही तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला 5 किलो साखर वाटपाचा उपक्रम चालू होता. आता दुष्काळी परिस्थिती पाहून त्यात भर टाकून भूमिहीन व शेतमजुर यांच्यासाठीही ‘माणुसकीची दिवाळी ‘हा नवीन उपक्रम चालू केला आहे.
यावर्षी पावसाच्या प्रदीर्घ खंडा मुले दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे बळीराजा, भूमिहीन शेतमजूर हे सर्व अडचणीत आलेले आहेत म्हणुन सावंत साहेबानी आपल्या मतदार संघात या दुष्काळी परिस्थितीत मतदाराच्या पाठीशी खंबीरपणे पणे उभे राहण्याचे घोषित केले आहे .साहेब या तिन्ही तालुक्यात 10 वर्षापासुन 5 किलो साखर प्रत्येक कुटुंबासाठी वाटायचा उपक्रम चालू आहे या वर्षीची दुष्काळी परिस्थिती पाहून साहेबांनी भूम वाशी परंडा या तिन्ही तालुक्यातील भूमिहीन आणि शेतमजूर दुष्काळग्रस्त कुटुंबा पर्यंत दिवाळी कीट भेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. दिवाळी कीट मध्ये जीवनावश्यक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे
‘माणुसकीची दिवाळी ‘
या कीट मध्ये रवा, खाद्य तेल ,हरभरा डाळ, मैदा, चिवडा मसाला, चुरमुरे, साखर, चहा पावडर, सुगंधी तेल,मोती आंघोळीचा साबण, आणि उटणे, आशा सामानाचा समावेश करण्यात आला आहे.










