तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत योगेश आडेचा ४०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक
लोणार प्रतिनिधी : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६ नुकत्याच लोणार येथे पार पडल्या. या स्पर्धेत सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, पांग्रा डोळे, ता. लोणार, जि. बुलढाणा येथील विद्यार्थी योगेश संदीप आडे याने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत संपूर्ण लोणार तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
योगेश आडे याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयासह परिसरातील विविध स्तरांतून त्याचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
आपल्या यशाचे श्रेय योगेशने आई-वडील तसेच सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशभाऊ कायंदे, विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय घुगे सर आणि क्रीडा शिक्षक श्री. अनिल थोरवे सर यांना दिले.
योगेशच्या या यशामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळाली असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींनी शुभेच्छा दिल्या.








