• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in क्राईम, सुरक्षा
0
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

अपहरण प्रकरणी पाच जणांच्या आवळल्या मुसक्या

RelatedPosts

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

मानवत तालुक्यातील घटना दूध आणायला गेलेल्या तरूणाचे कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी मानवत तालुक्यातील लोहरा येथे घडली. मात्र, मानवत पोलिसांची समयसूचकता, तांत्रिक कौशल्य आणि चारठाणा पोलिसांच्या नाकाबंदीमुळे अवघ्या काही तासांत पाचही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. अपहरणकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला बोरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहरा येथील दत्तात्रय अमृतराव जाधव हे गुरुवारी सकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास पोहंडूळ रोडवरील दूध डेअरीतून दूध आणण्यासाठी गेले होते.

यावेळी अज्ञात कारणावरून विठ्ठल भारतराव जाधव (रा. लोहरा), ओंकार बाबाराव कदम (रा. रामेटाकळी), कुलदीप निर्मळ (रा. खरबा, ता. मानवत), मोहन नानाभाऊ खिस्ते (रा. राजुरा, ता. सेलू) आणि दत्ता पांडुरंग खुडे (रा. खेर्डा, ता. पाथरी) या पाच जणांनी दत्तात्रय जाधव यांना अडवले, मारहाण केली आणि त्यांना कार (क्रमांक MH 12 WZ 6607) मध्ये बसवून पळवून नेले.

ही संपूर्ण घटना एका मुलाने पाहिली आणि त्याने तातडीने गावात जाऊन घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मानवत ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी तत्काळ चक्रे हलवली.

जखमी तरूणावर रुग्णालयात उपचार
दरम्यान, आरोपींनी दत्तात्रय जाधव यांना मारहाण करून बोरी येथील एका खाजगी दवाखान्यात सोडून पळ काढला होता. मानवत पोलीस पथकाने चारठाणा येथून कारसह पाचही जणांना ताब्यात घेतले.

मानवत पोलीस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे व त्यांच्या टीमच्या तत्परतेमुळे आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

लोकेशनचा पाठलाग आणि नाकाबंदी (अशी झाली कारवाई):
१. लोकेशन ट्रेस: पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी आरोपी विठ्ठल जाधव व अपहृत दत्तात्रय जाधव यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. पो. ह. फैयाज सय्यद, उमर सय्यद, अनिस कौसडीकर आणि शक्तीराज नैताम यांना देऊन पथक लोकेशनच्या दिशेने रवाना केले.
२. पोलिसांना सतर्कता: आरोपींचे लोकेशन बोरी परिसरात दाखवत असल्याने मानवत पोलिसांचे पथक बोरीपर्यंत गेले. मात्र लोकेशन सारखे बदलत असल्याने या मार्गावरील जिंतूर पोलिसांना सतर्क करून चारठाणा येथे नाकाबंदी लावण्यात आली.
३. आरोपी ताब्यात: चारठाणा येथे पोलीस अंमलदार मुजीब शेख, प्रमोद उगले, परमेश्वर थोरे आणि आशुतोष माने यांनी संशयित कार अडवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले.

Previous Post

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

Next Post

“मानवत मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल येथे १५ ऑगस्ट रोजी आयोजन; नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन”

Related Posts

क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
82
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
18
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
क्राईम

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

July 15, 2026
15
क्राईम

श्रीगोंद्यात भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमीला पुण्यात हलवले

July 12, 2026
198
Next Post
“मानवत मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल येथे १५ ऑगस्ट रोजी आयोजन; नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन”

"मानवत मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल येथे १५ ऑगस्ट रोजी आयोजन; नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन"

ताज्या बातम्या

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In