प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
नंदुरबार, दि. २९ ऑक्टोबर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज, गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
असा असेल पालकमंत्र्यांचा दौरा
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सकाळी ७.१५ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.४५ वाजता ते नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतील.
सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे. दुपारी १२ वाजता याच ठिकाणी ते नागरिकांच्या भेटीगाठी घेतील. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी ४ वाजता अक्कलकुवा तहसील कार्यालयात शासनाच्या विविध विकास योजनांच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. दौऱ्याच्या अखेरीस रात्री ८.४५ वाजता नंदुरबार रेल्वे टर्मिनस येथून खान्देश एक्स्प्रेसने ते दादरकडे प्रयाण करतील.
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आणि आढावा बैठकीतून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाययोजनांबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.











