सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय; ग्रामीण भागातील संशोधक विद्यार्थ्यांना होणार लाभ
श्रीगोंदा : प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल रामचंद्र गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक (रिसर्च गाईड) म्हणून मान्यता दिली आहे.
प्रा. डॉ. गायकवाड यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जर्नल्समध्ये अनेक संशोधनपर शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. इंग्रजी भाषेचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना मिळालेल्या या मान्यतेमुळे ग्रामीण भागातील इंग्रजी विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला याचा फायदा होणार आहे.
त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यातील विविध मान्यवरांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात, डॉ. सुदाम भुजबळ, प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. डॉ. राजाराम कानडे, डॉ. रावसाहेब काळे, प्रा. रमेश थोरात, डॉ. सुप्रिया पवार, डॉ. देवेंद्र बहिरम तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.











