• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कृतज्ञता संवाद; कार्यकर्त्यांच्या मेहनतीला विजयाचे श्रेय

सातारा, दि. ३० : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित आमदार सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांनी सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी कृतज्ञता संवाद साधला.

RelatedPosts

सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

कुसूर ग्रामपंचायतीत ‘बिहार पॅटर्न’द्वारे वृक्षसंवर्धनाला अभूतपूर्व प्रतिसाद!

यावेळी बोलताना आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी हा विजय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावरील जनतेचा अढळ विश्वास आणि तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेल्या मेहनतीचा सन्मान असल्याचे सांगितले. सातारा जिल्ह्यातील सुजाण मतदारांनी दिलेला कौल आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम यामुळेच हा ऐतिहासिक विजय मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

पदवीधरांचे न्याय्य हक्क, सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध आव्हाने विधिमंडळात ठामपणे मांडणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मतदारांनी आणि पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कराड उत्तरचे नेते देवराज पाटील (दादा), ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर देशमुख, मानसिंगराव जगदाळे, नरेश देसाई, विक्रमसिंह फडतरे, नितीन शिंदे, गोरखनाथ नलावडे, प्रवीण धस्के, महिला आघाडीच्या नेत्या सुवर्णाताई पाटील, अर्चनाताई पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार स्वीकारताना आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी पदवीधर मतदारसंघातील विविध समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. या कृतज्ञता संवादातून पदवीधरांच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे वाचा फोडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ad 1
Tags: Swapnil Patil
Previous Post

सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

Related Posts

सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर
ताज्या घडामोडी

सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

October 30, 2026
0
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था
ताज्या घडामोडी

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

October 30, 2026
5
कुसूर ग्रामपंचायतीत ‘बिहार पॅटर्न’द्वारे वृक्षसंवर्धनाला अभूतपूर्व प्रतिसाद!
ताज्या घडामोडी

कुसूर ग्रामपंचायतीत ‘बिहार पॅटर्न’द्वारे वृक्षसंवर्धनाला अभूतपूर्व प्रतिसाद!

October 30, 2026
2
खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला
ताज्या घडामोडी

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

October 30, 2026
1
नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!
ताज्या घडामोडी

नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!

October 30, 2026
3
सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश
ताज्या घडामोडी

सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

October 30, 2026
9

ताज्या बातम्या

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

October 30, 2026
सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

October 30, 2026
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In