• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाप्रमुख आरतीताई दीक्षित यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा; महिलांच्या तक्रारींचे निवारण

मेहकर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यातील मेळजानोरी येथील रेशन दुकानदाराकडून कार्डधारकांना धान्य वितरणात अनियमितता आणि गैरवर्तनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख सौ. आरतीताई दीक्षित यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर संबंधित महिलांच्या तक्रारींचे निवारण झाल्याचे सांगण्यात आले.

RelatedPosts

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

मेळजानोरी येथील त्रस्त महिलांनी रेशन दुकानदाराविरोधात अनेक गंभीर आरोप केले होते. ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी धान्य देणे, मात्र पावती पूर्ण वजनाची देणे, शासकीय दरापेक्षा अधिक पैसे घेणे, दुकान वेळेवर न उघडणे, धान्य वितरणानंतर अधिकृत मशीनची पावती न देणे, तसेच धान्याबाबत विचारणा केल्यास अपशब्द वापरणे आणि रेशन कार्ड रद्द करण्याची धमकी देणे, अशा तक्रारी महिलांनी केल्या. काही लाभार्थ्यांच्या पावत्या काढूनही त्यांना धान्य दिले जात नसल्याचाही आरोप करण्यात आला.

या प्रकाराला कंटाळून मेळजानोरी येथील महिलांनी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, उपजिल्हाप्रमुख सौ. आरती दीक्षित आणि शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळुकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यावेळी माजी आमदार रायमुलकर हे उपोषणस्थळी व्यस्त असल्याने त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी आरती दीक्षित यांच्यावर सोपवली.

त्यानुसार आरती दीक्षित यांनी तातडीने उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि मेहकर तहसीलदार यांची भेट घेतली. रेशन दुकानदाराविरोधातील तक्रारी आणि उपलब्ध पुरावे प्रशासनासमोर मांडून कारवाईची मागणी केली. या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने दखल घेतली आणि महिलांच्या मागण्यांवर कार्यवाही झाल्याचे सांगण्यात आले.

आपल्या हक्काचे धान्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मेळजानोरी येथील महिलांनी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, सौ. आरती दीक्षित आणि शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळुकर यांचे आभार मानले.

“जनतेच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध आमचा लढा असाच अविरत सुरू राहील,” अशी भूमिका उपजिल्हाप्रमुख सौ. आरती दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केली.

Ad 1
Tags: Hemantkumar Biyani
Previous Post

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

Related Posts

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर
ताज्या घडामोडी

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

November 3, 2026
12
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
11
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
ताज्या घडामोडी

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
20
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

November 1, 2026
13
कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण
ताज्या घडामोडी

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

November 1, 2026
3
जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला
ताज्या घडामोडी

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

November 1, 2026
8

ताज्या बातम्या

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

November 3, 2026
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In