• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

सोलर पॅनेल, बोअरवेल व विहिरींच्या मोटारींचे मोठे नुकसान; रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न

जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यातील बावी गावाच्या शिवारात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या शेतातील लाखो रुपयांच्या विद्युत आणि सोलर केबल्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे सोलर पॅनेल आणि शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारींचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

मिळालेल्या माहितीनुसार, बावी शिवारात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शेतात प्रवेश करून चार शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा यंत्रणेच्या मुख्य केबल्स तसेच स्टार्टरपासून विहिरीपर्यंत जोडलेल्या केबल्स कापून चोरून नेल्या. यामध्ये नाथा भाऊ देवकर, गोकुळ श्रीपती मंडलिक, सतीश भाऊसाहेब पवार आणि नितीन बाप्पा पवार यांच्या सोलर यंत्रणेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याशिवाय भास्कर श्रीपती निकम यांच्या शेतातील बोअरवेलची सुमारे ५०० फूट केबल चोरट्यांनी लंपास केली. तसेच भाऊसाहेब गुलाब चिकणे आणि प्रवीण बाळासाहेब निकम या दोन शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या स्टार्टरपासून थेट मोटारीपर्यंतच्या केबल्स कापून नेण्यात आल्या.

तालुक्यात शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर विद्युत आणि सोलर केबल्स चोरीला गेल्यामुळे शेतातील पाणीपुरवठा व सिंचन व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बावी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.

या घटनेची पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळी भेट द्यावी, पंचनामा करावा आणि संबंधित चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घ्यावा, अशी एकमुखी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Ad 1
Tags: Amrut Karande
Previous Post

उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

Next Post

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

Related Posts

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण
ताज्या घडामोडी

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

November 1, 2026
1
उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा
ताज्या घडामोडी

उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

November 1, 2026
8
पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
3
बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

November 1, 2026
10
सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’
ताज्या घडामोडी

सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’

November 1, 2026
6
भोर तालुक्यात १० ते १२ फुटांचा अजगर आढळला; सर्पमित्रांकडून सुरक्षित रेस्क्यू
ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात १० ते १२ फुटांचा अजगर आढळला; सर्पमित्रांकडून सुरक्षित रेस्क्यू

November 1, 2026
11
Next Post
कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

ताज्या बातम्या

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

November 1, 2026
जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

November 1, 2026
उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In