पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल; जिल्ह्यात संघटन विस्तार आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर काम करण्याची जबाबदारी
मालेगाव (प्रतिनिधी) : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी पत्रकार विनोद रोकडे (जैन) यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे कार्य, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष संजय मा. देशमुख यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आले. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक प्रा. डॉ. मोहन खडसे (अकोला) यांच्या हस्ते विनोद रोकडे (जैन) यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढविणे, जास्तीत जास्त पत्रकारांना संघटनेशी जोडणे तसेच पत्रकार बांधवांसोबत समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पत्रकारांच्या समस्या आणि सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहावे, तसेच सामाजिक बांधिलकी जपत नेतृत्वगुणांचा प्रभावी वापर करावा, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मित्रपरिवाराकडून विनोद रोकडे (जैन) यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.











