• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे IMA ला निवेदन; शहरात रोटेशन पद्धतीने २४ तास आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करण्याची मागणी

हिंगणघाट प्रतिनिधी :

RelatedPosts

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

हिंगणघाट, दि. ५ नोव्हेंबर : शहरातील बहुतांश खासगी दवाखाने व रुग्णालये रात्री ११ वाजल्यानंतर तसेच रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद राहत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. परिणामी, गंभीर रुग्णांना उपचारांसाठी सेवाग्राम, सावंगी किंवा नागपूर येथे जावे लागत असून, उपचारासाठी होणाऱ्या विलंबामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने व्यक्त केली आहे.

या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे, तालुकाप्रमुख मनिष देवढे आणि शहरप्रमुख सचिन पोटदुखे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), हिंगणघाटच्या अध्यक्षांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, अपघात, हृदयविकाराचा झटका, लहान मुलांना अचानक उद्भवणारा ताप, महिलांची प्रसूती अशा आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असते. मात्र, रात्रीच्या वेळी किंवा सुट्टीच्या दिवशी डॉक्टर उपलब्ध नसल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होते. विशेषतः ग्रामीण भागातून उपचारासाठी हिंगणघाट शहरात येणाऱ्या नागरिकांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास गंभीर परिणाम होण्याची भीतीही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या वैयक्तिक सुट्ट्यांना आपला विरोध नसून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात किमान रोटेशन पद्धतीने २४ तास आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध असावी, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. डॉक्टरांना समाजात देवासमान मानले जाते; त्यामुळे माणुसकीच्या नात्याने या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या तीन प्रमुख मागण्या

१. रात्रीच्या वेळी व सुट्टीच्या दिवशी IMA च्या माध्यमातून ऑन-कॉल ड्युटीवरील डॉक्टरांचे रोटेशन जाहीर करावे.

२. आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णालयांची यादी आणि संपर्क क्रमांक नागरिकांना सहज उपलब्ध होतील अशा सार्वजनिक ठिकाणी लावावेत.

३. या प्रश्नावर IMA आणि प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, वर्धा, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा तसेच वैद्यकीय अधीक्षक, हिंगणघाट यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत. निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी शितल चौधरी, शंकर मोहमारे, भास्कर ठवरे, हिरामण आवारी, प्रमोद एडलेवार, अनंता गलांडे, अमोल वादाफळे, गुणवंतजी वानखेडे, अविनाश धोटे, नितीन वैद्य, सुभाष काटकर, विलास चौधरी, किशोर इंगोले, पप्पू घवघवे, रफिक शेख, जुबेर शेख, गुड्डू डहाके, अशोक बावणे आदी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Bhaurao Kotkar
Previous Post

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

Next Post

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

Related Posts

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
ताज्या घडामोडी

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
4
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
ताज्या घडामोडी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
5
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात
ताज्या घडामोडी

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
4
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!
ताज्या घडामोडी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

November 7, 2026
20
प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!
ताज्या घडामोडी

प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!

November 7, 2026
6
श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण

November 7, 2026
66
Next Post
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In