• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

वडूज-दहिवडी रस्त्यावरील कॅनॉल परिसरात जुने मीटर उघड्यावर; स्मार्ट मीटर सक्तीने बसविल्याचा आरोप, अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चाचा इशारा

खटाव प्रतिनिधी :

RelatedPosts

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

खटाव : स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून खटाव तालुक्यात ग्राहकांमध्ये नाराजी वाढत असून, विविध संस्था व सामाजिक संघटनांचा विरोध असतानाही स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वडूज-दहिवडी मार्गावरील कॅनॉलजवळ बदलण्यात आलेले जुने मीटर मोठ्या प्रमाणात उघड्यावर फेकून दिल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेदरम्यान दंडाची भीती दाखवून तसेच दमदाटी करून ग्राहकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप काही ग्राहक व सामाजिक संघटनांनी केला आहे. ज्या कंपनीला स्मार्ट मीटर बसविण्याचे काम देण्यात आले आहे, त्या कंपनीचे अधिकारी तक्रारींकडे टाळाटाळ करीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलने केली; मात्र त्यानंतरही मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरूच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

एकीकडे तालुक्यातील नागरिक दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असताना, सुस्थितीत असलेले जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची घाई का केली जात आहे, असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिले मोठ्या प्रमाणात वाढून येत असल्याच्या तक्रारीही ग्राहकांनी केल्या आहेत. वारंवार निवेदने व तक्रारी करूनही संबंधित अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जुने मीटर बदलण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून, जुने मीटर उघड्यावर टाकण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास वडूज येथील महावितरण महामंडळाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्राहक व सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

Ad 1
Tags: Nitin Rathod
Previous Post

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

Related Posts

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!
ताज्या घडामोडी

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026
0
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
ताज्या घडामोडी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
5
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात
ताज्या घडामोडी

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
4
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!
ताज्या घडामोडी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

November 7, 2026
20
प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!
ताज्या घडामोडी

प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!

November 7, 2026
6
श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण

November 7, 2026
66

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In