• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

वनविभागाच्या सतर्कतेला यश; शहापूरमध्ये मादी बिबट्या आणि तिच्या दोन पिल्लांची सुखरूप भेट, कोरेगाव वनविभागाची कौतुकास्पद कामगिरी

पिंपोडे :

RelatedPosts

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

ऊसाच्या शेतात आढळलेली अवघ्या दहा ते बारा दिवसांची बिबट्याची दोन पिल्ले… आईपासून दुरावल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न… आणि त्याच परिसरात पिल्लांच्या शोधात भटकणारी बिबट्याची मादी! अशा परिस्थितीत वनविभागाने दाखवलेली सतर्कता, संयम आणि नियोजनबद्ध प्रयत्न अखेर यशस्वी ठरले. शहापूर (ता. कोरेगाव) येथे मादी बिबट्या आणि तिच्या दोन पिल्लांची सुखरूप भेट घडवून आणण्यात वनविभागाला यश आले. या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

शहापूर येथील शेतकरी पुरुषोत्तम मारुती माने यांच्या ‘काळाकडा’ नावाच्या शिवारातील उसाच्या शेतात तीन दिवसांपूर्वी ऊसतोड सुरू असताना दाट पाचटामध्ये अवघ्या दहा ते बारा दिवसांची बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली. अचानक पिल्ले दिसल्याने ऊसतोड कामगारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पिल्ले अत्यंत लहान असल्याने त्यांना त्यांच्या आईपासून वेगळे करणे धोकादायक ठरू शकते, याची जाणीव वनविभागाला होती.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून मादी बिबट्या पुन्हा पिल्लांच्या शोधात येण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली. त्यानुसार संबंधित परिसरात पाळत ठेवण्यात आली. दरम्यान, मादी बिबट्या पिल्लांच्या शोधात घटनास्थळी आली होती; मात्र काही कारणास्तव तिने पिल्लांना सोबत नेले नाही. त्यामुळे वनविभागाने आवश्यक खबरदारी घेत दोन्ही पिल्लांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

दरम्यान, वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी रात्री मादी बिबट्या अडकली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्थानिक पदाधिकारी, शेतकरी, ऊसतोडणी मुकादम आणि ऊसतोड कामगारांच्या सहकार्याने मादी बिबट्या व तिच्या दोन्ही पिल्लांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले. नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे पिल्ले आणि मादी यांची पुन्हा भेट घडवून आणण्याचा मार्ग मोकळा झाला.

या संपूर्ण मोहिमेत कोरेगाव वनविभागाने दाखवलेली तत्परता, संयम आणि सतर्कता तसेच स्थानिक नागरिकांनी दिलेले सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले. आईपासून दुरावलेल्या दोन चिमुकल्या पिल्लांना पुन्हा मायेची ऊब मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करताना मानवी संवेदनशीलता आणि वनविभागाचे योग्य नियोजन किती महत्त्वाचे असते, याचे उत्तम उदाहरण या घटनेतून समोर आले आहे.

Ad 1
Previous Post

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Related Posts

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
7
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
ताज्या घडामोडी

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
18
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!
ताज्या घडामोडी

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026
29
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
ताज्या घडामोडी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
8
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात
ताज्या घडामोडी

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
5
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!
ताज्या घडामोडी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

November 7, 2026
25

ताज्या बातम्या

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

November 10, 2026
आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In