• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

युवा फ्रेंड्स सर्कल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; महिला व ग्रामस्थांनी श्रमदानातून दिला एकीचा आणि स्वच्छतेचा संदेश

पत्रकार : पेण

RelatedPosts

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

पेण : “स्वच्छतेकडून समृद्धीकडे… एक पाऊल” हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत युवा फ्रेंड्स सर्कल फाऊंडेशनच्या वतीने वडमाळवाडी येथे रस्त्याची डागडुजी आणि स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या अभियानात वडमाळवाडीतील महिला भगिनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी

पावसाळ्यात वडमाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे मार्गावर मोठा खड्डा निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना तसेच वाहनचालकांना वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन युवा फ्रेंड्स सर्कल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख कैलासराजे घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने खड्ड्यात माती टाकून रस्त्याची डागडुजी करण्यात आली.

विहिरीकडे जाणारा रस्ता श्रमदानातून स्वच्छ

वडमाळवाडीतील विहिरीकडे जाणारा रस्ता पालापाचोळा, रानटी वेली, झाडे-झुडपे आणि कचऱ्याने व्यापला होता. या मार्गाने पाणी आणण्यासाठी तसेच कपडे व भांडी धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या दूर करण्यासाठी फाऊंडेशनच्या पुढाकाराने पत्रकार कैलासराजे घरत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिला भगिनी एकत्र आल्या आणि त्यांनी श्रमदानातून विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याची साफसफाई केली. स्वच्छतेमुळे संपूर्ण परिसर मोकळा व प्रसन्न झाला.

महिला व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

या उपक्रमात सौ. नर्मदा वाघे, सौ. चंद्रभागा पवार, गुलाब वाघे, रंजना वाघे, यमुना वाघे, बळीराम वाघे, तुळशीदास वाघे, मच्छिंद्र वाघे, मंगलीबाई वाघे, जागृती वाघे, कविता वाघे, आयतीबाई वाघे, मनीषा वाघे, पोशीबाई वाघे, रेश्मा हिलम, जानकीबाई वाघे, सविता वाघे, दामिनी वाघे, सरिता वाघे, मालू सवार, संगीता वाघे, सुविधा वाघे, शर्मिला वाघे, अस्मिता वाघे, रविता वाघे आदी महिला व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान केल्यास गावाच्या विकासासाठी कोणतेही काम सहज शक्य होते, याचा प्रत्यय या अभियानातून आला. ग्रामस्थांच्या एकजुटीने स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

आदिवासी बांधवांच्या सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी सातत्यपूर्ण योगदान

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते कैलासराजे घरत हे आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती, नशामुक्ती व व्यसनमुक्ती अभियान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वनराई बंधारे अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून ते आदिवासी वाडी-वस्त्यांमध्ये कार्यरत आहेत. वडमाळवाडीतील रस्त्याची डागडुजी आणि स्वच्छता अभियान हा त्याच सामाजिक कार्याचा एक भाग आहे.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल वडमाळवाडी ग्रामस्थांकडून युवा फ्रेंड्स सर्कल फाऊंडेशन आणि पत्रकार कैलासराजे घरत यांचे कौतुक करण्यात येत आहे. ग्रामविकासासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सहभाग आणि सामूहिक श्रमदान किती महत्त्वाचे आहे, हे या उपक्रमाने अधोरेखित केले.

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

November 10, 2026
10
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
8
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
ताज्या घडामोडी

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
18
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!
ताज्या घडामोडी

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026
29
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
ताज्या घडामोडी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
9
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात
ताज्या घडामोडी

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
5

ताज्या बातम्या

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

November 10, 2026
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026
कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In