अळकुटी येथे गोरगरीब व गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्याचे मोफत वाटप; सामाजिक बांधिलकीतून उपक्रम
पारनेर :
सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठामपणे उभे आहेत, असे प्रतिपादन शिवसेना नेते सुजित झावरें यांनी केले.
सुजित झावरें यांच्या पुढाकारातून आणि अळकुटीच्या सरपंच तथा शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख डॉ. कोमल संदीप भंडारी यांच्या सहकार्याने अळकुटी (ता. पारनेर) येथे गोरगरीब व गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही सणाचा आनंद घेता यावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. फराळ साहित्य मिळाल्याने अनेक गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
यावेळी कुंदन साखला, संजय मते, खंडू भुकन, अरुण ठाणगे, संतोष काटे, उद्योजक संदीप भंडारी, अमोल भंडारी, विजय काटे, साईनाथ घाडगे, गोरक्षनाथ गलांडे, सारिका गलांडे, महेंद्र पांढरकर, सीताराम जाधव, बाळासाहेब पोखर्णा, सुरेश डेरे, दगडू पाटील, संतोष शिंदे, रामदास भंडारी, दीपक कड, सखाराम भंडारी, संगीता परंडवाल, पांडुरंग शिंदे, सोपान शिंदे आणि बापू म्हस्कुले आदी उपस्थित होते.
गरजू कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश पोहोचविणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.









