• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 14, 2026
in Blog
0
सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम

उरण | प्रतिनिधी

RelatedPosts

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व नव्या पिढीला समजावे, मुलांमध्ये इतिहासाविषयी आवड व जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने सारडे विकास मंचाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत किल्ले स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ६८ किल्ल्यांची नोंदणी झाली.

सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रितेश कोळी, अभिषेक ठाकूर आणि अक्षय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत सहभागी झालेल्या किल्ल्यांचे परीक्षण व निरीक्षण करण्यात आले. यावेळी बालस्पर्धकांनी आपल्या कल्पकतेचा, कलाकौशल्याचा आणि ऐतिहासिक जाणिवेचा सुंदर आविष्कार सादर केला.

किल्ले रायगडाला प्रथम क्रमांक

या स्पर्धेत किल्ले रायगड साकारल्याबद्दल राज महेश घरत याने प्रथम क्रमांक पटकावला. मुरुड-जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी स्वाद घनश्याम पाटील याला द्वितीय क्रमांक मिळाला.

तर उत्तेजनार्थ पारितोषिके अजिंक्यतारा किल्ल्यासाठी ईशान निलेश म्हात्रे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी मोहित मिलन माळी यांना प्रदान करण्यात आली. विजेत्यांना बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ६८ बालस्पर्धकांना नानोशी, पनवेलचे सरपंच विनंती मोहन पाटील यांच्या वतीने भेटवस्तू देऊन प्रोत्साहनपर गौरविण्यात आले. त्यामुळे मुलांचा उत्साह द्विगुणित झाला.

मान्यवरांची उपस्थिती; ॲड. रनिता ठाकूर यांचा विशेष सन्मान

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद पाटील (माजी सरपंच, वशेणी), निवास गावंड (सुयश क्लासेस, आवरे), रविंद्र पाटील (माजी उपसरपंच, कळंबुसरे), ॲड. रनिता ठाकूर, आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर, कॉमेडी कलाकार रोशन घरत, गजानन ठाकूर, कृषिमित्र प्रकाश माळी, हॉटेल एम.डी.एस.चे मालक नितीन म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, श्री गणेश फर्निचरचे मालक विनोद पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील आणि सिद्धेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ॲड. रनिता ठाकूर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन पाटील (खोपटे) यांनी प्रभावीपणे केले. याप्रसंगी निवास गावंड सर यांनी मनोगत व्यक्त करताना, “सारडे विकास मंच ही एक आदर्श संस्था असून, अशा संस्थेचा आपण एक भाग आहोत, याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढले.

दात्यांचे सहकार्य आणि बालचमूचा उत्स्फूर्त सहभाग

किल्ले स्पर्धेसाठीची बक्षिसे रविंद्र पाटील (माजी उपसरपंच, कळंबुसरे), प्रा. अनिल नायडू, प्रशांत म्हात्रे आणि विनायक म्हात्रे यांनी दिली. तर स्पर्धकांसाठी खाऊची व्यवस्था हरिश्चंद्र म्हात्रे, गणेश पाटील आणि नितीन म्हात्रे यांनी केली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लहानग्यांनीही मोलाचे योगदान दिले. किल्ल्यांची नावनोंदणी आणि फोटोग्राफीची जबाबदारी रिया म्हात्रे, नील म्हात्रे, अक्षता, निरव म्हात्रे, राजेश पाशी, सारा म्हात्रे आणि विभा म्हात्रे या बालचमूने उत्साहाने पार पाडली.

तसेच प्रकाश माळी, विनोद पाटील, अमोल पाटील, सिद्धेश पाटील आणि हरिश्चंद्र म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

अध्यक्षांकडून आभार

कार्यक्रमाच्या शेवटी सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवर, स्पर्धक, पालक आणि आयोजनासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

इतिहासाची ओळख करून देणे, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाविषयी जागृती निर्माण करणे आणि बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या उद्देशाने सारडे विकास मंचाने राबविलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

Ad 1
Previous Post

वेळापूरच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा

Next Post

शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ अंकाचे प्रकाशन उत्साहात

Related Posts

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे
Blog

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

November 14, 2026
5
कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट
Blog

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

November 13, 2026
6
पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे
Blog

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

November 13, 2026
6
भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे
Blog

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

November 13, 2026
8
येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
Blog

येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

November 13, 2026
6
महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा
Blog

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

November 13, 2026
25
Next Post
शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ अंकाचे प्रकाशन उत्साहात

शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ अंकाचे प्रकाशन उत्साहात

ताज्या बातम्या

पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

November 14, 2026
शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ अंकाचे प्रकाशन उत्साहात

शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ अंकाचे प्रकाशन उत्साहात

November 14, 2026
सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

November 14, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In