• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

शेतकऱ्यांना एकरी ५ हजार १ रुपयांचा हमीभाव देण्याची मागणी; ऊसासह इतर पिकांच्या हमीभावासाठीही एकजुटीने लढण्याचे आवाहन

पाथर्डी | प्रतिनिधी

RelatedPosts

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

ऊस पिकाचा जुना दर रद्द करून शेतकऱ्यांना योग्य भाववाढ मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आणि आर्थिक हितासाठी वेळ देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन चितळी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा उद्योजक अशोक आमटे यांनी केले आहे.

राज्य व केंद्र सरकारने देशातील सर्व खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना उसाच्या दरासाठी सबसिडी द्यावी, तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान एकरी ५ हजार १ रुपयांचा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी आमटे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व ऊस उत्पादक आणि शेतकरी हितचिंतकांनी शेतकरी संघटना व समविचारी नेतृत्वाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलनात सहभागी व्हावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

ऊसदरवाढीच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सहभागी होऊन शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमटे यांनी केले. योग्य मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊस पिकानंतर इतर शेतमालालाही हमीभाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लवकरच आंदोलन उभारावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मांडतील, तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करेल आणि साखर कारखान्यांना विशेष सबसिडी देण्याबाबत विनंती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने पेट्रोलप्रमाणे उसालाही सबसिडी द्यावी आणि साखरेचे दर नियंत्रणात ठेवावेत, अशी मागणी आमटे यांनी केली. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर वापरणाऱ्या गरीब ग्राहकांनाही दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

ऊसदरवाढीसाठीच्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन अशोकदादा आमटे यांनी केले आहे.

Ad 1
Tags: Santosh Narwade
Previous Post

राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला

Next Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

Related Posts

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
ताज्या घडामोडी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

November 15, 2026
0
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती
ताज्या घडामोडी

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

November 15, 2026
4
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी
ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

November 15, 2026
3
राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला
ताज्या घडामोडी

राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला

November 14, 2026
13
राजू आवळे यांची शिवसेना (उबाठा) शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदी निवड
ताज्या घडामोडी

राजू आवळे यांची शिवसेना (उबाठा) शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदी निवड

November 14, 2026
30
गेवराईत भीषण अपघात; हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

गेवराईत भीषण अपघात; हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी

November 14, 2026
10
Next Post
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

ताज्या बातम्या

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

November 15, 2026
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

November 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In