• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

साडेसात एकरांहून अधिक जागा आरक्षित; बस आगाराअभावी प्रवाशांची गैरसोय, बस चार्जिंग सेंटरही अद्याप सुरू नाही

केज | प्रतिनिधी

RelatedPosts

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन

बीड जिल्ह्यातील सर्वात जुन्या तालुक्यांपैकी एक असलेल्या केज शहरात बस आगार सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

केज शहर हे खामगाव-पंढरपूर आणि अहमदपूर-अहिल्यानगर या दोन राष्ट्रीय महामार्गांच्या जोडणीवर वसलेले आहे. त्यामुळे येथून दररोज हजारो प्रवासी महाराष्ट्राच्या विविध भागांत ये-जा करतात. प्रवाशांची वाढती संख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेता केज येथे स्वतंत्र बस आगार असणे आवश्यक असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.

केज-बीड महामार्गालगत बस आगारासाठी साडेसात एकरांहून अधिक जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, ही जागा अद्याप वापराविना पडून असून, परिसरात अतिक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जागेवर तातडीने बस आगार स्थापन करून ते कार्यान्वित करावे, अशी मागणी समिती गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे.

सध्याचे धारूर बस आगार केजमधील प्रवाशांसाठी सोयीचे ठरत नाही. केज येथून सुटणाऱ्या बसगाड्यांना धारूरपर्यंत सुमारे १५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. प्रवासी संख्येचा विचार करता हा प्रवास आर्थिकदृष्ट्याही परवडणारा नसल्याचे समितीने म्हटले आहे. त्यामुळे केज येथे स्वतंत्र बस आगार मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

केज येथे बस चार्जिंग सेंटर सुरू करण्यासाठी सुमारे एक वर्षापूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा आणि केज विकास संघर्ष समितीने यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले होते. मात्र, मंजुरी मिळून एक वर्ष उलटूनही हे चार्जिंग सेंटर अद्याप सुरू झालेले नाही.

हे चार्जिंग सेंटर लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणीही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती प्रा. हनुमंत भोसले यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.

या निवेदनावर प्रा. हनुमंत भोसले, रामहरी कोल्हे, नासेर मुंडे आणि शेषराव घोरपडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Ad 1
Tags: Kamlakar Sonawane
Previous Post

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

Related Posts

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती
ताज्या घडामोडी

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

November 15, 2026
4
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी
ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

November 15, 2026
3
ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन
ताज्या घडामोडी

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन

November 15, 2026
1
राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला
ताज्या घडामोडी

राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला

November 14, 2026
13
राजू आवळे यांची शिवसेना (उबाठा) शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदी निवड
ताज्या घडामोडी

राजू आवळे यांची शिवसेना (उबाठा) शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदी निवड

November 14, 2026
30
गेवराईत भीषण अपघात; हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

गेवराईत भीषण अपघात; हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी

November 14, 2026
10

ताज्या बातम्या

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

November 15, 2026
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

November 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In