• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

थकीत आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा; प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची प्रा. बबनराव आंधळे यांची मागणी

बीड | प्रतिनिधी | दि. १४ नोव्हेंबर २०२६

RelatedPosts

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन

राज्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, ऊस यांसह विविध पिके पाण्याअभावी करपून गेल्याने शेतकऱ्यांसमोर पीककर्जाची परतफेड कशी करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील पीककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी केली आहे.

कर्जाचे नवे-जुने केल्याचा आरोप

नागपूर येथील कर्जमाफी आंदोलनादरम्यान कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे नवे-जुने केल्याचे समोर आले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नवीन कर्जाची रक्कम मिळालेली नाही. केवळ कागदपत्रांवर सह्या आणि अंगठे घेऊन कर्जाचे नवे-जुने करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोप प्रा. आंधळे यांनी केला आहे.

अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे नवे-जुने करण्यात आले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पात्र शेतकरी अद्याप लाभापासून वंचित

कर्जमाफीची घोषणा होऊनही पहिल्या यादीतील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतरही बँक खाती बंद करण्यात आल्याचे, तर अनेकांची खाती होल्डवर असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येत नसल्याचे प्रश्न समोर येत आहेत.

त्यामुळे कर्जमाफी योजनेतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

थकीत आणि नियमित कर्जदारांनाही दिलासा द्या

शेतकऱ्यांनी ज्या पिकांच्या लागवडीसाठी पीककर्ज घेतले, तीच पिके दुष्काळामुळे हातची गेली आहेत. उत्पन्नच मिळाले नाही, तर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड कशी करायची, असा सवाल प्रा. आंधळे यांनी उपस्थित केला.

थकीत तसेच नियमित पीककर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे. कर्जमाफीच्या यादीतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Ad 1
Tags: Kamlakar Sonavle
Previous Post

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन

Next Post

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

Related Posts

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
ताज्या घडामोडी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

November 15, 2026
1
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती
ताज्या घडामोडी

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

November 15, 2026
4
ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन
ताज्या घडामोडी

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन

November 15, 2026
1
राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला
ताज्या घडामोडी

राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला

November 14, 2026
13
राजू आवळे यांची शिवसेना (उबाठा) शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदी निवड
ताज्या घडामोडी

राजू आवळे यांची शिवसेना (उबाठा) शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदी निवड

November 14, 2026
30
गेवराईत भीषण अपघात; हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

गेवराईत भीषण अपघात; हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी

November 14, 2026
10
Next Post
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

ताज्या बातम्या

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

November 15, 2026
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

November 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In